Wednesday 11 January 2023

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी, तर प्रवेश परिक्षा 29 एप्रिलला होणार

 


जालना,दि. 11 (जिमाका) :-  जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दि. 29 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. यासाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरले जात आहेत. जालना जिल्ह्यातील रहीवासी असलेल्या व इयत्ता पाचवी वर्गात सन 2022-23 मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांची नोंदणी सेवा केंद्रावरुन व इतर यंत्रणेचा वापर करुन ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य शैलेश नागदेवते यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी -2023 साठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी पाचवीच्या मुख्याध्यापकांकडून प्रमाणपत्र भरुन घ्यावेत व त्यावर विद्यार्थ्याचा फोटो, स्वाक्षरी व पालकांची स्वाक्षरी करुन सदर प्रमाणपत्र हे मुख्याध्यापकद्वारे सत्यपित/प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीची जाहिरात, माहितीपत्रक, सुधारीत प्रमाणपत्र इ. www.navodaya.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. फॉर्म भरण्यासाठीचे  प्रमाणपत्रे, फोटो, स्वाक्षऱ्या इ. हे 10 ते 100 केबीमध्ये स्कॅन करुन संकेतस्थळ www.navodaya.gov.in  यावर भरावेत. विद्यार्थ्यांचा जन्म हा दि. 1 मे 2011 ते 30 एप्रिल 2013 या दरम्यानचा असावा. जिल्हातील सर्व मुख्याध्यापकांनी प्रवेश परिक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज भरावेत, आवाहनही प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.  

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment