Tuesday 3 January 2023

5 जानेवारी रोजी आयोजित अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात येणार नाही

 


 

जालना, दि. 3 (जिमाका) :-  अल्पसंख्याक विकास विभागाचे परिपत्रकान्वये अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्याबाबत निर्देश प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने अल्पसंख्याक हक्क दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. भारत निवडणूक आयोगाकडील अधिसुचन्वये औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर झाली असून संपुर्ण जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे. तरी  दि.5 जानेवारी 2023 रोजी आयोजित अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात येणार नाही, असे उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment