Friday 13 January 2023

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने यांची मतदान केंद्राला भेट निवडणूक कामकाजाचा घेतला सविस्तर आढावा

 


जालना, दि. 13 (जिमाका) :- 05-औरंगाबाद  विभाग  शिक्षक मतदारसंघ निवडणुक -2023 च्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त केलेले उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ) शेखर मनोहर चन्ने (भा.प्र.से.) यांनी आज जालना जिल्हयातील मतदान केंद्राला भेट देऊन निवडणूक विषयक कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.

श्री. चन्ने हे आज जालना जिल्हयाच्या दौऱ्यावर आले होते. सकाळी त्यांनी बदनापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेतील मतदान केंद्राला भेट देऊन  पाहणी केली. मतदारांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली. यावेळी उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, तहसीलदार व अन्य अधिकारी उपस्थित होते. दुपारी जालना येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी निवडणूक कामाकाजाचा सविस्तर आढावा घेतला. औरंगाबाद  विभाग  शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रीया सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्याची सूचना करुन त्यांनी आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिले. तसेच निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे सूचित केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अपर पोलीस अधीक्षक इंदल बहूरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे आदी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment