Friday 6 January 2023

समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळेसाठी बदनापूर शहरात इमारत भाडे तत्वावर देण्याचे आवाहन

 


 जालना,दि. 6 (जिमाका) :- बदनापूर शहरात 200 विद्यार्थांच्या निवासासह शाळेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रचलित भाडे दराने इमारत भाडे तत्वावर देण्यास इच्छुक इमारत मालकांनी जालना येथील समाज कल्याण कार्यालयात दि. 20 जानेवारी 2023 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त अमित घवले यांनी केले आहे.

बदनापूर शहरात 200 इमारत क्षमता असलेली मुलांची शासकीय निवासी शाळा भाडे तत्वावर सुरु करण्यासाठी इमारतीचे क्षेत्रफळ मोकळया जागेसह प्रति विद्यार्थी 100 चौ. फुटापर्यंत  इमारतीमधील एकुण खोल्या, स्नानगृह, स्वच्छता गृह, विजेची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, मोकळे मैदान, विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने वॉल कंपाऊंड, पाणी साठवण्याची व्यवस्था, पाण्याचा स्त्रोत, इमारतीचा परिसर विद्यार्थ्यांना राहण्यास आरोग्याच्या दृष्टीने योग्य परिसर, इमारतीमध्ये गृहपाल यांच्या निवासासाठी व्यवस्था इत्यादी आवश्यक सर्व सोयी सुविधायुक्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रचलित भाडे दराने इमारत भाडे तत्वावर देणाऱ्या इच्छुक इमारत मालकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथून विहीत नमुन्यातील माहिती प्रपत्र घेवून दि. 20 जानेवारी 2023 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत. अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालयास संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment