जालना, दि. 29 (जिमाका) -- 5- औरंगाबाद विभाग शिक्षक
मतदारसंघ निवडणूकीसाठी दि. 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 वा. दरम्यान
मतदान होणार आहे. जालना जिल्हयात एकूण 15 मतदान
केंद्र तर 5 हजार 37 मतदार आहेत. मतदान सुरळीत
पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.जालना जिल्हयात एकुण 5 हजार 37 मतदारांपैकी
पुरुष मतदार 4 हजार 186 व स्त्री मतदार 851 आहेत. तालुकानिहाय मतदार संख्या पुढीलप्रमाणे
आहे
जालना तालुका- पुरुष
मतदार 1098, स्त्री मतदार 450 एकुण मतदार 1548, बदनापुर तालुका - पुरुष मतदार 198,
स्त्री मतदार 49 एकुण मतदार 247, भोकरदन तालुका- पुरुष मतदार 876, स्त्री मतदार
138, एकुण मतदार 1014, जाफ्राबाद तालुका- पुरुष मतदार 415 स्त्री मतदार 55 एकुण मतदार
470, परतुर तालुका - पुरुष मतदार 368, स्त्री मतदार 30 एकुण मतदार 398, मंठा तालुका - पुरुष मतदार 372 स्त्री मतदार 28 एकुण
मतदार 400, अंबड तालुका - पुरुष मतदार 533 स्त्री मतदार 70 एकुण मतदार 603, घनसावंगी
तालुका- पुरुष मतदार 326 स्त्री मतदार 31 एकुण मतदार 357 एवढी मतदार संख्या आहे, अशी
माहिती पदनिर्देशित अधिकारी (05 -औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ) तथा उपजिल्हा निवडणूक
अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे यांनी दिली आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment