Wednesday 4 January 2023

स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावेत

 


जालना, दि. 4 (जिमाका) :-  जिल्ह्यातील जालना-बदनापूर तालुक्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिक व स्वातंत्र्य सैनिक वारसपत्नी निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र तहसील कार्यालय, जालना येथील खोली क्र.11 मध्ये तातडीने सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार जालना यांनी केले आहे.

स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन धारकांकडून हयातीचे प्रमाणपत्र वर्षातुन दोन वेळा म्हणजेच जानेवारी व जुलै या महिन्यात पहिल्या दिवशीच घ्यावे त्याशिवाय निवृत्ती वेतनाचे प्रदान करण्यात येवू नये असे  दि.15 डिसेंबर 2014 रोजीच्या परिपत्रकान्वये सुचना देण्यात आलेल्या आहेत. हयातीचे प्रमाणपत्र विलंबाने दिल्यास थकबाकीसह निवृत्ती वेतन देण्यात येते. स्वातंत्र सैनिक व स्वातंत्र्य सैनिक वारसपत्नी निवृत्तीवेतनधारकांनी विहीत वेळेत हयातीचे प्रमाणपत्र तहसील कार्यालय, जालना येथे सादर करणे आवश्यक आहे. हयात प्रमाणपत्र विलंबाने प्राप्त झाल्यास निवृत्तीवेतन प्रदान करण्यास विलंब होवू शकतो. तरी जालना-बदनापूर तालुक्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र आपले पेंशन खाते असलेल्या बँक व्यवस्थापकाची स्वाक्षरी घेवून हयात प्रमाणपत्र मुळ  प्रतीसह आधारकार्ड, बँकेच्या पासबुकाची छायांकित प्रत, भ्रमणध्वनी क्रमांक व महाराष्ट्र शासनाचे पेंशन मंजूरी आदेश आदी कागदपत्रासह सादर करावेत. असे तहसीलदार, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment