Friday 6 January 2023

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 30 जानेवारीला स्थानिक सुटी असल्याने शिक्षक मतदारांना बजावता येणार मतदानाचा हक्क

 


 

जालना, दि. 6 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. कार्यक्रमानूसार मतदान दि. 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. निवडणूकीत मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात यावी, असे निर्देश आहेत.

मात्र, जालना जिल्ह्यासाठी वार्षिक स्थानिक सुट्ट्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापुर्वीच दि. 21 डिसेंबर 2022 रोजी घोषित करण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये दि. 30 जानेवारी 2023 रोजी राजाबाग सवार दर्गा उत्सव निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे, याबाबत शिक्षकांना अवगत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment