Wednesday 11 January 2023

युवा दिनानिमित्त 12 जानेवारीला प्रभातफेरीचे आयोजन 12 ते 26 जानेवारी या जनजागृती पंधरवाड्यात विविध कार्यक्रम

 


          जालना,दि. 11 (जिमाका) :-  दि. 12 जानेवारी  हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षीची थिम "इट्स ऑल इन द माईंड" ( कोणत्याही व्यक्तीच्या समस्यांचे मूळ मुख्यत: त्याचे स्वत:चे विचार आहेत) एचआयव्ही, एड्ससह जगणाऱ्या व्यक्ती विषयक कलंक व भेदभाव दूर करण्याकरीता समाजाचा दृष्टीकोन बदलण्यास व्यक्तीचे विचार कारणीभूत असतात, हे या थीममधून सुचविले आहे. युवा वर्ग हा एचआयव्ही/एड्स संदर्भात अधिक संवेदनशील असून या निमित्ताने युवावर्गामध्ये एचआयव्ही/एड्स संदर्भात जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. युवावर्ग हा सर्जनशील असल्याने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्यात जनजागृती आणता येईल. यासाठी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधुन संपुर्ण जालना जिल्ह्यात युवा पिढीमध्ये एड्स विरोधी अभियान राबवण्याचा मानस आहे.

            हा दृष्टीकोन ठेऊन महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक (डापकु) कडून राष्ट्रीय युवा दिनानिमित्त 12 जानेवारी 2023 रोजी प्रभात फेरीचे आयोजन सामान्य रुग्णालय येथे सकाळी 9.30 वाजता करण्यात आले आहे. प्रभात फेरीमध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थींनींनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.  

दि. 12 ते 26 जानेवारी 2023 या कालावधीतील जनजागृती पंधरवाडा तपशील

12 जानेवारी 2023 रोजी जिल्हा व तालुकास्तरावर प्रभात फेरीचे आयोजन. या प्रभात फेरीमध्ये कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिंनींनी तसेच स्थानिक युवकांचा सहभाग असेल. एनसीसी, एनएसएस, आआरसी विद्यार्थी व विद्यार्थीनी जास्तीत जास्त संख्येन सहभागी होतील

 एचआयव्ही तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर : - 12 ते 26 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये जिल्ह्यातील महाविद्यालयात एचआयव्ही तपासणी, रक्तदान शिबीर आयोजित करणे व युवा पिढी व जनसामान्यांमध्ये एचआयव्हीची मोफत तपासणी आणि एचआयव्ही बाधीतांबरोबर कलंक व भेदभाव बाबत व्यापक जनजागृती करुन मोहिम अधिक व्यापक करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत संदेश देऊन एचआयव्ही तपासणी व रक्तदान करण्यास प्रोत्साहित केले जाईल.

एचआव्ही,एड्स विषयी तज्ञांची व्याख्याने :- 12 ते 26 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये जिल्ह्यातील विविध कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयात तज्ञांची व्याख्याने आयोजित केले जातील. विषय :- एचआयव्ही, एड्स विषयी मुलभुत माहिती, कलंक आणि भेदभाव, एचआयव्हीचा प्रतिबंध, एचआयव्ही संसर्गितासाठी सेवा- सुविधा, एचआयव्ही व सकारात्मक जीवनशैली, एचआयव्हीमुळे देशाच्या विकासावर होणार परिणाम, एचआयव्ही संदर्भात तरुणांची भूमिका व जबाबदारी, एचआयव्ही तपासणी आणि औषधोपचार इत्यादी.

स्पर्धा  :- जिंगल्स किंवा रोल प्ले किंवा फ्लॅश –मोब. विषय :- एचआयव्ही/एड्सबाबत समज- गैरसमज,   एचआयव्ही / एड्स (प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम -2017 आणि  एचआयव्ही/एड्स कलंक व भेदभाव

स्पर्धा दि. 12 ते 26 जानेवारी 2023 या पंधरवाड्यामध्ये घेण्यात येतील. स्पर्धेतील विजेत्या प्रथम, द्वितीय व तृतीय टिमला रोख स्वरुपात पारितोषिक व प्रमाणपत्र जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक (डापकू) सामान्य रुग्णालय जालनाकडुन देण्यात येईल, असेही प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment