Thursday 5 January 2023

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या मतदान केंद्र परिसरात प्रतिबंध


जालना,दि. 5 (जिमाका):-  भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक-2023 चा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला असून त्यानुसार जालना जिल्ह्यातील 15 मतदान केंद्रावर दि. 30 जानेवारी, 2023 रोजी मतदान होणार आहे. तरी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या मतदान केंद्रापासून 200 मीटर परिसरात निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जारी केले आहेत.

जालना जिल्ह्यात औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी जालना जिल्ह्यात, औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करुन मतदान केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन,  पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरीक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्याकरिता प्रतिबंध करणे आवश्यक आहे.

        जिल्हादंडाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक मतदान केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणूकीच्या कामा व्यतिरीक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्याकरिता प्रतिबंध केला आहे. हा आदेश जालना जिल्ह्यात दि.30 जानेवारी 2023 रोजी मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान सुरु झाल्यापासून ते मतदान संपेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले 

No comments:

Post a Comment