Thursday 5 January 2023

बालस्नेही बालकल्याण समितीचे उद्घाटन संपन्न

 


जालना,दि. 5 (जिमाका):- जालना जिल्ह्यातील काळजी आणि  संरक्षणाची गरज लक्षात घेता बाल न्याय अधिनियम 2015 नुसार कलम 2(14) नुसार काळजी आणि  संरक्षणासाठी गरज असणारे मुलांसाठी योग्य निर्णय पुनर्वसन करणे गरज असणारे बालकांसाठी योग्य निर्णय देणे सक्षम यंत्रणा बाल कल्याण समितीचे बालस्नेही संकल्पनेतून तयार करून  आज दि. 5 जानेवारी 2023 रोजी उद्घाटन करण्यात आले.

यावेळी महिला व बालविकास अधिकारी  रेशमा चिमेद्र, परतुरस्वराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे भाऊसाहेब गुंजाळ, बालन्याय मंडळ सदस्य आश्विनी धन्नावत, बालकल्याण समिती जालना  अध्यक्ष एकनाथ राउत,  श्रीमती योगिता माटे, श्रीमती विद्या लंके, श्रीमती शालिनी लोखंडे, ॲड. कैलास जारे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे, चाईल्ड लाईनचे संतोष दाभाडे, बालगृह अधिक्षक अमोल राठोड, गजानन राठोड, मोहसिन परसुवाले, सचिन चव्हाण  यासह  जिल्हा बाल संरक्षण कक्ष कर्मचारी जिल्हा महिला बालविकास कर्मचारी उपस्थित  होते. जालना जिल्ह्यातील बालकांसाठी आपले स्थान वाढावे  आणि  आपले हक्क मागणी संरक्षण हे न घाबरता बालकांनी मांडावे यासाठी जालना जिल्ह्यातील बालकल्याण समिती बालस्नेही करण्यात आली व योग्य प्रकारे बालकांना काळजी आणि  संरक्षण देण्यासाठी बालकल्याण समिती चांगल्या प्रकारे काम करेल, असे बालकल्याण समितीचे अध्यक्ष एकनाथ राऊत  यांनी सांगितले.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment