Monday 16 January 2023

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या मतदानासाठी जालना जिल्ह्यात 15 मतदान केंद्र

 


 

जालना, दि. 16 (जिमाका) :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या मतदानासाठी जालना जिल्ह्यात एकुण 15 मतदान केंद्र  आहेत. मतदान केंद्र ही महसूल मंडळनिहाय असून जिल्ह्यात मतदान केंद्र क्र.51 ते 65 या क्रमांकाची राहणार आहेत. अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.ज्ञानोबा बाणापूरे यांनी दिली आहे.

            मतदान केंद्रांचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे आहे.  मतदान केंद्र क्र. 51 - जालना शहरात रेल्वेस्टेशन रोडवरील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा उत्तर बाजू खोली क्र. 2  येथे शिक्षक मतदार यादी भाग क्र. 66 अंतर्गत समाविष्ट गावे जालना शहर महसूल मंडळातील राहतील.

मतदान केंद्र क्र. 52 -  जालना शहरात रेल्वे स्टेशन रोडवरील जिल्हा परिषद (मुलांची) प्रशाला सभागृह  येथे शिक्षक मतदार यादी भाग क्र. 66 अंतर्गत समाविष्ट गावे जालना शहर महसूल मंडळातील राहतील.  

मतदान केंद्र क्र. 53  इंदेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, इंदेवाडी शाळा क्र.1 येथे शिक्षक मतदार यादी भाग क्र. 67 अंतर्गत समाविष्ट गावे जालना ग्रामीण महसूल मंडळातील तर शिक्षक मतदार यादी भाग क्र.73 अंतर्गत समाविष्ट गावे वाघ्रुळ जहांगिर महसूल मंडळातील राहतील.

मतदान केंद्र क्र.54-   रामनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुर्व बाजूस अंतर्गत समाविष्ट गावे रामनगर महसूल मंडळातील तसेच शिक्षक मतदार यादी भाग क्र. 68 अंतर्गत गावे पाचनवडगाव महसूल मंडळातील राहतील.तर भाग क्र. 69 अंतर्गत रामनगर महसूल मंडळातील गावे राहतील.

 मतदान केंद्र क्र.55 - नेर जिल्हा परिषद हायस्कुल खोली क्र.1 येथे शिक्षक मतदार यादी भाग क्र.70 अंतर्गत समाविष्ट गावे विरेगाव महसूल मंडळातील व शिक्षक मतदार यादी भाग क्र.71 अंतर्गत नेर महसूल मंडळातील आणि शिक्षक मतदार यादी भाग क्र.72 अंतर्गत समाविष्ट गावे सेवली महसूल मंडळातील राहतील.  

मतदान केंद्र क्र.56 - बदनापूर शहरात जिल्हा परिषद हायस्कुल उत्तर बाजुस खोली क्र. 1 येथे शिक्षक मतदार यादी भाग क्र.74 अंतर्गत समाविष्ट गावे बदनापूर महसूल मंडळातील व शिक्षक मतदार यादी भाग क्र.75 अंतर्गत समाविष्ट गावे रोशनगाव महसूल मंडळातील आणि शिक्षक मतदार यादी भाग क्र.76 अंतर्गत समाविष्ट गावे सेलगांव महसूल मंडळातील तसेच शिक्षक मतदार यादी भाग क्र.77 अंतर्गत समाविष्ट गावे बावणेपांगरी महसूल मंडळातील तर शिक्षक मतदार यादी भाग क्र.78 अंतर्गत समाविष्ट गावे दाभाडी महसूल मंडळातील राहतील.  

मतदान केंद्र क्र.57 - भोकरदन येथील जिल्हा परिषद हायस्कुल येथे शिक्षक मतदार यादी भाग क्र.79 अंतर्गत समाविष्ट गावे भोकरदन महसूल मंडळातील तर शिक्षक मतदार यादी भाग क्र. 80 अंतर्गत समाविष्ट गावे हसनाबाद महसूल मंडळातील तसेच शिक्षक मतदार यादी भाग क्र.81 अंतर्गत समाविष्ट गावे सिपोरा बाजार महसूल मंडळातील व शिक्षक मतदार यादी भाग क्र.83 अंतर्गत समाविष्ट गावे धावडा महसूल मंडळातील, शिक्षक मतदार यादी भाग क्र.85 अंतर्गत समाविष्ट गावे केदारखेडा महसूल मंडळातील आणि शिक्षक मतदार यादी भाग क्र.86 अंतर्गत समाविष्ट गावे आन्वा महसूल मंडळातील  राहतील.  

मतदान केंद्र क्र.58 - पिंपळगाव रेणूकाई येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत खोली क्र.1 मध्ये शिक्षक मतदार यादी भाग क्र. 82 अंतर्गत समाविष्ट गावे पिंपळगाव रेणूकाई महसूल मंडळातील राहतील.  

मतदान केंद्र क्र.59 - राजूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील खोली क्र.1 मध्ये  शिक्षक मतदार यादी भाग क्र. 84 अंतर्गत समाविष्ट गावे राजूर महसूल मंडळातील राहतील.  

मतदान केंद्र क्र.60 - जाफ्राबाद येथील जिल्हा परिषद हायस्कुलमध्ये  दक्षिणेकडील खोली क्र.1 येथे शिक्षक मतदार यादी भाग क्र. 87 अंतर्गत समाविष्ट गावे जाफ्राबाद महसूल मंडळातील व शिक्षक मतदार यादी भाग क्र.88 अंतर्गत समाविष्ट गावे माहोरा महसूल मंडळातील तर शिक्षक मतदार यादी भाग क्र.89 अंतर्गत समाविष्ट गावे वरुड बु. महसूल मंडळातील तसेच शिक्षक मतदार यादी भाग क्र. 90 अंतर्गत समाविष्ट गावे कुंभारझरी महसूल मंडळातील आणि शिक्षक मतदार यादी भाग क्र. 91 अंतर्गत समाविष्ट गावे  टेंभूर्णी महसूल मंडळातील राहतील.  

मतदान केंद्र क्र.61 - अंबड  येथील जिल्हा परिषद हायस्कुलमध्ये  पुर्वेकडील खोली येथे शिक्षक मतदार यादी भाग क्र.101 अंतर्गत समाविष्ट गावे अंबड महसूल मंडळातील व  शिक्षक मतदार यादी भाग क्र.102 अंतर्गत समाविष्ट गावे जामखेड महसूल मंडळातील व   शिक्षक मतदार यादी भाग क्र. 103 अंतर्गत समाविष्ट गावे धनगर पिंपरी महसूल मंडळातील तसेच व  शिक्षक मतदार यादी भाग क्र. 104 अंतर्गत समाविष्ट गावे राहिलागड महसूल मंडळातील राहतील.

मतदान केंद्र क्र.62 - अंबड  येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक मतदार यादी भाग क्र.105 अंतर्गत समाविष्ट गावे वडीगोद्री  महसूल मंडळातील व  शिक्षक मतदार यादी भाग क्र. 106 अंतर्गत समाविष्ट गावे गोंदी महसूल मंडळातील आणि शिक्षक मतदार यादी भाग क्र. 107 अंतर्गत समाविष्ट गावे सुखापूरी  महसूल मंडळातील राहतील.

मतदान केंद्र क्र.63 - घनसावंगी येथे नगरपंचायत कार्यालय खोली क्र.1 येथे शिक्षक मतदार यादी भाग क्र.108 अंतर्गत समाविष्ट गावे घनसावंगी महसूल मंडळातील, शिक्षक मतदार यादी भाग क्र.109 अंतर्गत समाविष्ट गावे कुंभार पिंपळगाव महसूल मंडळातील, शिक्षक मतदार यादी भाग क्र.110 अंतर्गत समाविष्ट गावे तिर्थपुरी महसूल मंडळातील, शिक्षक मतदार यादी भाग क्र.111 अंतर्गत समाविष्ट गावे अंतरवाली टेंभी महसूल मंडळातील, शिक्षक मतदार यादी भाग क्र.112 अंतर्गत समाविष्ट गावे जांबसमर्थ महसूल मंडळातील, शिक्षक मतदार यादी भाग क्र.113 अंतर्गत समाविष्ट गावे राणी उंचेगाव महसूल मंडळातील आणि शिक्षक मतदार यादी भाग क्र.114 अंतर्गत समाविष्ट गावे रांजणी महसूल मंडळातील राहतील.

मतदान केंद्र क्र.64 - परतूर येथील जिल्हा परिषद प्रशालेतील उत्तरेकडील बाजुस शिक्षक मतदार यादी भाग क्र.92 अंतर्गत समाविष्ट गावे आष्टी महसूल मंडळातील, शिक्षक मतदार यादी भाग क्र. 93 अंतर्गत समाविष्ट गावे सातोना खुर्द महसूल मंडळातील, शिक्षक मतदार यादी भाग क्र.94 अंतर्गत समाविष्ट गावे श्रीष्टी महसूल मंडळातील, शिक्षक मतदार यादी भाग क्र. 95 अंतर्गत समाविष्ट गावे परतूर महसूल मंडळातील तसेच शिक्षक मतदार यादी भाग क्र.96 अंतर्गत समाविष्ट गावे वाटुर महसूल मंडळातील राहतील.

मतदान केंद्र क्र.65 - मंठा येथील जिल्हा परिषद प्रशालेतील पुर्वेकडील खोलीत शिक्षक मतदार यादी भाग क्र.97 अंतर्गत समाविष्ट गावे मंठा महसूल मंडळातील, शिक्षक मतदार यादी भाग क्र.98 अंतर्गत समाविष्ट गावे ढोकसाळ महसूल मंडळातील, शिक्षक मतदार यादी भाग क्र.99 अंतर्गत समाविष्ट गावे तळणी महसूल मंडळातील आणि शिक्षक मतदार यादी भाग क्र.100 अंतर्गत समाविष्ट गावे पांगरी गोसावी महसूल मंडळातील राहतील. असे सहायक मतदार नोंदणी अधिकारी, 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ तथा जिल्हाधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment