Tuesday 10 January 2023

वर्ष 2023 आंतरराष्ट्रीय ‘पौष्टीक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित मकर संक्रांती-भोगी हा दिवस ‘पौष्टीक तृणधान्य दिन’ कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन

 


       जालना,दि. 10 (जिमाका) :- संयुक्त राष्ट्रसंघाने  सन 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पौष्टीक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व  त्याचे फायदे काय आहेत या बरोबरच तृणधान्य पिकांचे क्षेत्र उत्पादन व उत्पादकता वाढ कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. दि. शासन निर्णयान्वये 6 जानेवारी 2023 नुसार आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मक्रार संक्रांती-भोगी हा सणाचा दिवस दरवर्षी राज्यामध्ये पौष्टीक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्याबाबत सुचना दिल्या आहेत.

            या दिनाचे औचित्य साधून कृषि सहाय्यक हे गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य  पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाधा, मुलाखती, तृणधान्य पिकांपासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ यांची माहिती देणे यासाठी प्रगतीशील शेतकरी, आहार तज्ञ, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करुन कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. मकर संक्रांती-भोगी हा दिवस राज्यामध्ये पौष्टीक तृणधान्य दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एस रणदिवे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment