Wednesday 4 January 2023

अनुकंपा उमेदवारांना प्रतिक्षा यादीवरील आक्षेप सादर करण्याबाबत आवाहन

 


जालना, दि. 4 (जिमाका) :-  जिल्ह्यातील अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी प्रतिक्षाधीन उमेदवारांची जिल्हा परिषदेतंर्गतची दि.30 डिसेंबर 2022 अखेरची प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. तरी उमेदवारांच्या काही हरकती/आक्षेप असल्यास त्यांनी जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभाग कार्यालयास 15 दिवसांच्या आत लेखी स्वरुपात सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कले आहे.

शासकीय सेवेत असताना दिवंगत झाल्यास कुटुंबावर ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीत कुटुंबियांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या अनुकंपा नियुक्ती योजनेच्या अनुषंगाने जालना जिल्हा परिषदेतंर्गत अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी प्रतिक्षाधीन उमेदवारांची दि.30 डिसेंबर 2022 अखेरची प्रतिक्षा यादी एनआयसीच्या  संकेतस्थळावर व जालना जिल्हा परिषदेच्या zpjalna.co.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच प्रतिक्षा यादीची एक प्रत जालना जिल्हा परिषदेच्या सुचना फलकावर डकविण्यात आली आहे. तरी प्रतिक्षाधीन यादीमधील उमेदवारांच्या काही हरकती/आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात सादर करावे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment