Tuesday 10 January 2023

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे यांचे आवाहन जिल्ह्यातील युवक-युवतींनी प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होवून रोजगाराच्या महापर्वणीचा लाभ घ्यावा

 


जालना,दि. 10 (जिमाका) :-  विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सन 2023 या नवीन वर्षात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा कौशल्य विकास, जगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना या कार्यालयात जागेवर निवड संधी (प्लेसमेंट ड्राईव्ह) मोहीमेतंर्गत बुधवार दि. 11 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. तरी नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींनी वेळेवर उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये  सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या महापर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता  विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे यांनी केले आहे.

नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सन 2023 या नवीन वर्षात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात येत  आली असून जिल्हा कौशल्य विकास, जगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्या कार्यालयात जागेवर निवड संधी (प्लेसमेंट ड्राईव्ह) मोहीम आयोजित करण्यात येणार आहे. याप्रमाणे जानेवारी महिन्यातील  बुधवार दि.  11 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला आहे. यासाठी लक्ष्मी कॉटस्पीन, सामनगांव रोड जालना यांची आयटीआय फिटर/इलेक्ट्रीशियन साठी 10 पदे, आणि विक्रम टी प्रोसेसर प्रा.लि.जालना यांची आयटीआय मशिनीस्ट/फिटर/ इलेक्ट्रीशियन  साठी 10 पदे अशी एकूण 20 रिक्तपदे  प्राप्त झालेली आहेत. यासाठी नोकरी इच्छुक पात्रताधारक उमेदवारांच्या  प्रत्यक्ष  मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध  करुन दिली जाणार आहे.

जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. उमेदवारांनी यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक (Job Seekar) लॉगीनमधून आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर डॅसबोर्डमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून प्रथम औरंगाबाद विभाग  व नंतर जालना जिल्हा निवडून त्यातील SPECIAL JOB FAIR-1 (2022-23) JALNA याची निवड करावी. उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. सदर आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपस्थित असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान दोन प्रतीत बायोडाटासह  फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इ. कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून बुधवार दि. 11 जानेवारी 2023 रोजी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना येथे सकाळी 10 वाजता उपस्थित रहावे, असे सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment