Tuesday 3 January 2023

नवोदय विद्यालय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

 


 

जालना, दि. 3 (जिमाका) :-  सन 2022-23 मध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या व जालना जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेसाठी www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर सेवा केंद्रावरुन किंवा इतर माध्यमाद्वारे मंगळवार दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. तरी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे नवोदय विद्यालय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन परतूर जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य शैलेश नागदेवते यांनी  केले आहे.

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी-2023 साठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापुर्वी पाचवीच्या मुख्याध्यापकांकडून प्रमाणपत्र भरुन घ्यावेत व त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो, स्वाक्षरी व पालकांची स्वाक्षरी करुन हे प्रमाणपत्र मुख्याध्यापकाद्वारे सत्यापित करणे आवश्यक आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीची जाहिरात, माहितीपत्रक, सुधारित प्रमाणपत्र हे www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.  अर्ज करण्यासाठी प्रमाणपत्रे, छायाचित्र व स्वाक्षरीही 10 ते 100 केबीमध्ये स्कॅन करुन अपलोड करावी. विद्यार्थ्यांचा जन्म हा दि.1 मे 2011 ते 30 एप्रिल 2013 या कालावधी दरम्यानचा असावा. असे   प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, अंबा-परतूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment