Wednesday 4 January 2023

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची अधिसुचना 5 जानेवारीला होणार प्रसिद्ध

 


जालना,दि. 4 (जिमाका):- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने दि. 29 डिसेंबर 2022 रोजी जाहीर केला असून गुरुवार, दि. 5 जानेवारी 2023 रोजी निवडणूक अधिसुचना पदनिर्देशित ठिकाणी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दिली आहे.

05 -औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची अधिसूचना विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. ही अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, उपविभागीय अधिकारी, तहसील, पंचायत समिती, नगर परिषद/नगरपालिका, ग्रामपंचायत कार्यालये तसेच सर्व शासकीय कार्यालयात आणि जिल्ह्याच्या  संकेतस्थळावर दि. 5 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment