Friday 1 December 2023

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून जागतिक एडस दिनानिमित्त जनजागृती शिबीर संपन्न

 


 

 जालना दि. 30 (जिमाका) :-   दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस हा जागतिक एड्स दिन म्हणुन पाळला जातो. जगभर पसरलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी आणि या रोगामुळे मरण पावलेल्यांचा शोक व्यक्त करण्यासाठी हा दिवस पाळावा असे संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केले आहे. शुक्रवार दि.1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9.45 वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती शिबीर संपन्न झाले.

जनजागृती शिबीरामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी वर्ग आणि लोकअभिरक्षक कार्यालय, जालना येथील लोकअभिरक्षक (विधिज्ञ) उपस्थित होते. सदर जनजागृती शिबीरामध्ये एड्स हा रोग ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही) द्वारे होतो. एचआयव्ही शरीरातील रोगप्रतिकारक पेशी नष्ट करतो किंवा त्याचे नुकसान करतो. एड्सची पहिली लक्षणे म्हणजे इन्फ्लूएंझा (फ्ल्यू) सारखी लक्षणे किंवा सूजलेल्या ग्रंथी असू शकतात. परंतु काही वेळा लक्षणे दिसू शकत नाहीत. दोन किंवा तीन महिन्यांनंतर लक्षणे दिसू शकतात. घसा खवखवणे, स्नायू दुखणे, पुरळ, तोंड किंवा जननेंद्रियाच्या अल्सर, डोकेदुखी, ताप, मुख्यतः मान वर सूजलेल्या लिम्फ ग्रंथी, सांधे दुखी, अतिसार, रात्री घाम येणे इत्यादी लक्षणे असू शकतात. या कार्यक्रमाची सांगता ही लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणुन एक भव्य रॅली काढुन झाली. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment