Friday 15 December 2023

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहासाठी इमारत भाडेतत्त्वावर मिळण्यासाठी आवाहन

 


 

जालना,दि. 15 (जिमाका) :-  सहायक आयुक्त समाज कल्याण अंतर्गत मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह जालना करीता 80 विद्यार्थिनींना पुरेल अशी किमान 8 हजार स्वेअर फुट इमारत, मुबलक पाणी, वीज, किमान 10 शौचालय व 10 स्नानगृह तसेच सुस्थितीत व विद्यार्थिनींच्या दृष्टीने सुरक्षित असणारी इमारत भाडे तत्त्वावर घेणे आवश्यक आहे.

कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी निश्चित केलेले भाडे इमारत मालकास मंजुर करण्यात येईल. तसेच घरभाड्यातील सर्व प्रकारचे कर हे इमारत मालकास भरावे लागतील इमारत भाडे तत्त्वावर देण्यास इमारत मालक तयार असल्याचे संमतीपत्र घरमालकास करुन देणे बंधनकारक राहील या सर्व अटी व शर्तीची  पुर्तता करणाऱ्या व इच्छुक इमारत मालकांनी सहायक आयुक्त समाज कल्याण, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना, गृहपाल मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, बचत भवनच्या पाठीमागे, जालना यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन गृहपाल मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, जालना  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment