Friday 1 December 2023

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून कायदेविषयक शिबीर संपन्न

 


 जालना दि. 30 (जिमाका) :-   महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या दिनदर्शिकेत नमूद केल्यानूसार व अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी निर्देशित केल्यानुसार गुरुवार दि. 30 नोव्हेंबर 2023 रोजी जालना जिल्ह्यामधील श्रीमती दानकुंवर कन्या विद्यालय, सरस्वती भुवन प्रशाला, उर्दू हायस्कुल, राष्ट्रीय हिंदी विद्यालय, जि.प.प्रशाला मुलांची शाळा, जि.प.कन्या प्रशाला या शाळेमध्ये  कायदेविषयक शिबीर संपन्न झाले.

कायदेविषयक शिबीरामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणुन लोक अभिरक्षक कार्यालयाचे अॅड. यश आर. लोसरवार, अॅड. डी.ए. शेंडगे, अॅड. पठाण अर्सलान, अॅड. वाय. एस. कुलकर्णी, अॅड. वाय. एस. खरात, अॅड. एम.आर.वाघुंडे तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाचे मानसोपचार विभागाच्या वैशाली मेहतरे, शितल शिनगारे, अंकित गिरमकार, प्रदिप शिंदे आदी उपस्थित होते.  शिबीरामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाबद्दल माहिती देण्यात आली तसेच मुलभूत हक्क व कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच औषधी व अंमली पदार्थाचा गैरवापर व व्यसनाधिनता या विषयावर जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथील तज्ञांनी मार्गदर्शन केले. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment