Tuesday 12 December 2023

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

 


       जालना दि. 12 (जिमाका) :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या  परीक्षेची पुर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दिनांक  8 जानेवारी 2024 ते 17 जानेवारी  2023 या कालावधीत SSB कोर्स क्र. 56 आयोजीत करण्यात येत आहे.  सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भेाजन आणि प्रशिक्षणाची  नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

            तरी, जालना जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या संधीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत मुलाखतीस हजर रहावे.  मुलाखतीस येतेवेळी  त्यांनी वर Department of Sainik Welfare, Pune (DSW) वर सर्च करुन त्यामधील SSB-56 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेश पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.  

            केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमुद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेवुन यावेत :-कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अकेडमी एक्झामिनेशन(NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हीसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.एनसीसी ‘C’ सर्टीफिकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेड मघ्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी.            टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखती साठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नांव असावे.             

            अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय. डी. – training.pctcnashik@gmail.com व दुरध्वनी क्रं. 0253-2451032 व व्हॉट्सॲप क्रं 9156073306  असुन कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  यांनी केले आहे.

                                                          -*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment