Monday 11 December 2023

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 410 प्रकरणे निकाली तर 7 कोटी 15 लाख रुपयांची वसुली

 


 

            जालना दि. 11 (जिमाका) :- जालना येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून शनिवार दि. 9 डिसेंबर 2023  रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये  पक्षकारांनी आपापली प्रकरणे सामजस्यांने न्याय तडजोडीने निकाली काढण्यासाठी संबंधित न्यायालयाकडे अर्ज सादर केले होते. तरी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 410  प्रकरणे सामजस्यांने निकाली काढण्यात आली तर 7 कोटी 15 लाख 33 हजार 62 रुपये रक्कमेची वसुली करण्यात आली आहे. अशी माहिती  सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

         राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्षा वर्षा मोहिते, जिल्हा न्यायाधीश ए.जी.जोशी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ यांच्यासह जिल्ह्याच्या मुख्यालयी 9 पॅनल ठेवण्यात आले त्यावर पॅनल प्रमुख म्हणून सर्व न्यायाधीशांनी काम पाहिले.  तसेच सर्व न्यायाधीश, पॅनल सदस्य व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सर्व प्रकारची तडजोडपात्र दिवाणी  व फौजदारी प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे , धनादेश अनादर संदर्भातील प्रकरणे, बी.एस.एन.एलची दावा दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आले होते. जालना येथील कौटूंबिक न्यायालयात 5 प्रकरणात सन्मानजनक तडजोड होवून प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामधील एका प्रकरणातील जोडप्‌याने परस्परांमधील वाद सामंजस्याने मिटवून घटस्फोटाचा मार्ग सोडून संसार करण्याचा निर्णय घेतला. पक्षकारांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली निघाली.  असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment