Thursday 7 December 2023

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 



जालना दि. 7 (जिमाका) :-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालनातर्फे दि. 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांच्यासह सर्व न्यायीक अधिकारी आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. डॉ. बाबासाहेबांची पुण्यतिथी देशभरात 'महापरिनिर्वाण दिन' म्हणून साजरी केली जाते. भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य उच्चनीचतेची सामाजिक व्यवस्था बदलवून टाकण्यासाठी आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली बौद्ध धर्माचा स्वीकार केला. परिनिर्वाण हे बौद्ध धर्मातील प्रमुख तत्वांपैकी एक तत्त्व आहे. 'परिनिर्वाण' चा अर्थ 'मृत्यूनंतरचे निर्वाण' किंवा जीवन मृत्युच्या चक्रातून मुक्तता. बौद्ध धर्मानुसार, जो व्यक्ती निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक इच्छा आणि भ्रमांपासून मुक्त होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी म्हणजेच, 'महापरिनिर्वाण दिन' होय.

जिल्हा न्यायाधीश-3 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर जयस्वाल आणि जिल्हा न्यायाधीश-2 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अलौकीक कार्याबाबत व सामाजिक परिवर्तनाबरोबरच त्यांनी प्रत्येक क्षेत्रात दिलेल्या अमुल्य अशा योगदानाबाबत उपस्थितांना माहिती दिली, असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-


No comments:

Post a Comment