Friday 1 December 2023

आकांक्षित तालुका कार्यक्रमातंर्गत पदभरती

 


 


 

जालना, दि. 1 (जिमाका) – नीती आयोग भारत सरकार यांच्यामार्फत आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील बदनापुर आणि परतुर या दोन तालुक्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे दोन आकांक्षित तालुका फेलो यांची कंत्राटी पध्‍दतीने मानधन तत्त्वावर सहा महिन्यांसाठी नियुक्ती करावयाची आहे. कामाचे मूल्यमापन आणि निती आयोगाच्या निर्देशानुसार मुदतवाढीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. थेट मुलाखतीद्वारे ही पदभरती करण्यात येणार आहे.

आकांक्षित तालुका फेलो  या पदासाठी नियुक्ती ठिकाण पंचायत समिती, बदनापूर  तसेच  नियुक्ती ठिकाण पंचायत समिती, परतुर अशा दोन पदसंख्येसाठी मानधन 55 हजार रुपये प्रति महिना राहील.

सविस्तर जाहिरात व अर्जाच्या नमुन्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांच्या  https://jalna.gov.in/en/notice category/recruitment/  संकेतस्थळावर भेट द्यावी. अर्ज करण्याकरीता अंतिम दि. 11 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6.15 पर्यंत असून भरलेला परिपूर्ण अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व्हे क्र. 488 औरंगाबाद-नागपूर रस्ता जालना 431213 येथे सादर करावा. कोणत्याही प्रश्नांसाठी संपर्क क्रमांक 7738709008 किंवा मेल – abp.jalna@gmail.com  असा आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.

-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment