Friday 15 December 2023

जालना जिल्ह्यात “विकसित भारत संकल्प यात्रे”ला उत्स्फूर्त प्रतिसाद लोककल्याणकारी शासकीय योजनांची जनजागृती योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन शनिवार, 16 डिसेंबर रोजीचे यात्रेचे वेळापत्रक

 





 

जालना, दि. 15 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा”  जालना जिल्ह्यात आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या लोकल्याणकारी योजनांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. जालना जिल्हयात विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.  

शनिवार, दि. 16 डिसेंबर रोजी पुढील गावात जाणार विकसित भारत संकल्प यात्रा - विकसित भारत संकल्प यात्रा शनिवार, दि. 16 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील सिपोरा अभोरा व देऊळझरी, मंठा तालुक्यातील कानडी व इंचा, भोकरदन तालुक्यातील केदारखेडा, चिंचोली, बरांजळा लोखंडे, परतूर तालुक्यातील हाताडी व येनोरा, अंबड तालुक्यातील सारंगपूर व काटखेडा, बदनापूर तालुक्यातील चिखली येथे जाईल. या यात्रेसमवेत पंचायत समिती अंतर्गत अधिकारी-कर्मचारी असतील.

विकसित भारत संकल्प यात्रेस ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यत, स्वयंरोजगारापासून कृषीपर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनांचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

   विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आरोग्य, कृषी, आवास, प्रधानमंत्री आयुष्यमान योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री  भारतीय जन औषधी परियोजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, जन धन योजना, अटल पेन्शन योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, मुद्रा योजना, हर घर जल-जलजीवन मिशन, किसान क्रेडीट कार्ड,  पीएम सुरक्षा विमा योजना, पीएम पोषण अभियान, दिनदयाल अंत्योदय योजना तसेच आदिवासी विभागासाठी विशेष योजना, स्कॉलरशिप योजना, वंदन योजना, अशा विविध विभागांच्या योजनांचा प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. विविध ठिकाणी शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येत आहे.  तसेच योजनांचा लाभ देण्यासोबतच शासकीय योजनांचे माहिती पत्रक, भित्तीपत्रकाचे वाटपही करण्यात येत आहे.

विकसित भारत संकल्प यात्रा 26 जानेवारी 2024 पर्यंत सुरू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी यात्रेमध्ये सहभागी होऊन केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

-*-*-*-*-*-

 

 

 

No comments:

Post a Comment