Monday 11 December 2023

ईव्हीएम केवळ यंत्र नव्हे आपल्या मतांच बुलेटप्रुफ कवच - अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार

 

 

जालना,  (जिमाका) दि. 11 :- निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी वापरले जाणारे ‘ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र’ अतिशय पारदर्शक असून आपले अमुल्य मत नोंदविलेल्या उमेदवारालाच आपले मत जात असते. ईव्हीएम म्हणजे गुप्त आणि सुरक्षित निवडणूकांचा आधुनिक मंत्र असून ईव्हीएम केवळ यंत्र नव्हे आपल्या मतांच बुलेटप्रुफ कवच आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वारावर मतदान यंत्र प्रात्यक्षिक केंद्र उभारले असून येथे ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे अभ्यागतांना प्रात्यक्षिक दि.29 फेब्रुवारी 2024 पर्यंत दाखविण्यात येणार आहे.  सोमवार दि. 11 डिसेंबर 2023 रोजी अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार हस्ते ईव्हीएम जनजागृती व प्रात्यक्षिकाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ईव्हीएम मशीनवर  मतदान केले असता मतदाराने निवडलेल्या उमेदवाराच्या चिन्हाला आपले मत नोंदविले गेल्याचे व्हीव्हीपॅट मशीवर असणाऱ्या स्क्रिनवर चिन्ह दिसून येवून आवाज आल्यानंतरच आपले मतदान पुर्ण होत असते. अशी माहिती यावेळी तंत्रनिकेतनचे निदेशक अमोल जवेरी हे वेळोवेळी भेट देणाऱ्या अभ्यागतांना देत आहेत. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे अभ्यागत प्रवेशद्वाराजवळील ईव्हीएम अर्थात मतदान यंत्र प्रात्यक्षिक केंद्रास भेट देत माहिती जाणून घेताना दिसून येत आहेत.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment