Tuesday 12 December 2023

नेहरु युवा केंद्राच्यावतीने ॲनेमिया तपासणी शिबीर संपन्ऩ

 




जालना दि. 12 (जिमाका) :- नेहरू केंद्र युनिसेफ महाराष्ट्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, तळणी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद कनिष्ठ व विज्ञान महाविद्यालय, तळणी व विश्वनाथ विद्यालय तळणी येथे दि. 5 डिसेंबर व 11 डिसेंबर 2023 रोजी ॲनिमिया हिमोग्लोबीन व आरोग्य तपासणीमध्ये  मुला-मुलींची तपासणी करण्यात आली. त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रयोगशाळा तंत्र कृष्णा सानप ,आकाश राठोड व नवनाथ सपाटे आणि महाविद्यालयाचे सदर शेख, भावसार व संत भगवान बाबा मंडळचे अध्यक्ष वैभव कांगणे आदींच्या उपस्थितीमध्ये ॲनिमिया व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. यावेळी मेरा युवा भारत पोर्टल वर जास्तीत जास्त संख्येने रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन माहविद्यालयाचे प्राध्यापक यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment