Friday 8 December 2023

रोजगाराच्या संधीसाठी जालना येथे 13 डिसेंबर रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

  

 

जालना दि. 8 (जिमाका) :- नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने महिन्याच्या प्रत्येक बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास, जगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,जालना यांचे मार्फत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना 431203 येथे दिनांक 13 डिसेंबर, 2023 बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधी आयोजित करण्यात आली आहे. यासाठी  बी.एस.एस. फाईनान्स प्रा. लि. जालना यांची दहावी/बरावी/ पदवी उत्तीर्ण उमेदवारांकरीता फिल्ड ऑफिसरसाठी 50 रिक्तपदे  प्राप्त झालेली आहेत. याकरीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणा-या उमेदवारांच्या  प्रत्यक्ष  मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध आहे.

                       जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक (Job Seekar) लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्ड च्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅसबोर्ड मधील पडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून जालना जिल्हा निवडून त्यातील SPECIAL JOB FAIR-13 (2023-24) JALNA याची निवड करावी. उद्योजक/नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान दोन प्रतीत बायोडाटासह  फोटो,शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इ.कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून 13 डिसेंबर, 2023 बुधवार सकाळी 11 ते दुपारी 2 प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना 431203 येथे उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये  सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या पर्वणीचा निश्चित लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, भुजंग रिठे,  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.        

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment