Monday 18 December 2023

शासकीय वसतिगृहासाठी भाडे तत्वावर इमारत देण्यास इच्छुकांनी 31 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

 


 

जालना, दि. 18 (जिमाका) :- मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, जालना या वसतिगृहासाठी भाडे तत्वावर इमारत घेण्यासाठी प्रस्ताव  मागविण्यात आले आहेत. तरी जालना शहराच्या ठिकाणी भाडे तत्वावर इमारत द्यावयास तयार असणाऱ्या इमारत मालकांनी सर्व कागदपत्रांसह दि. 31 डिसेंबर 2023 पर्यंत समाज कल्याण कार्यालय, जालना येथे सादर करावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्रदिप भोगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

मागासवर्गीय मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे चालविणे" या योजनेतंर्गत शासनाने मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, जालना हे वसतिगृह बचतभवन, जुन्या तहसील कार्यालयाशेजारी असलेल्या शासकीय इमारतीमध्ये कार्यान्वीत आहे. या वसतिगृहाची इमारत मोडकळीस आल्याने जालना शहराच्या ठिकाणी भाडे तत्वावर इमारत घ्यावयाची आहे. त्यासाठी 80 मुली सामावू शकतील अशी सर्व सोयी-सुविधांनी युक्त म्हणजेच, विद्यार्थी निवासी कक्ष, स्वयंपाकगृह, भोजन कक्ष, स्टोअर रूम, स्वच्छतागृह, पार्कींग स्टँड, विज व पाण्याची व्यवस्था, विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने वॉल कम्पाऊंड, पाणी साठवण्याची व्यवस्था, पाण्याचा स्रोत असलेली इमारत ज्या व्यक्तीकडे उपलब्ध आहे, अशा व्यक्तींनी इमारत भाड्याने द्यावयाचा प्रस्ताव इमारतीच्या सर्व कागदपत्रांसह दि. 31 डिसेंबर 2023 पुर्वी समाज कल्याण कार्यालय, जालना येथे सादर करावा.  अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना या कार्यालयाशी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी संपर्क साधावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment