Monday 18 December 2023

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मिळतोय लोककल्याणकारी योजनांचा लाभ मंगळवार, 19 डिसेंबर रोजीचे यात्रेचे वेळापत्रक

 



जालना, दि. 18 (जिमाका) :- केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती व लाभ हे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम सध्या केंद्र सरकारकडून सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू लाभार्थ्यांचा शोध घेणे, त्यांना योजनांची माहिती देणे, त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे या पध्दतीने काम सुरू आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सक्रीयपणे कार्य करीत आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेस जालना जिल्हयात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.  

मंगळवार, दि. 19 डिसेंबर रोजी पुढील गावात जाणार विकसित भारत संकल्प यात्रा - विकसित भारत संकल्प यात्रा मंगळवार, दि. 19 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील खांडवी व खांडवीवाडी, जालना तालुक्यातील नेर, सारवाडी/नेर/शेवगा, जाफ्राबाद तालुक्यातील नळविहिरा व निमखेडा बु., भोकरदन तालुक्यातील खापरखेडा व तळेगाव, मंठा तालुक्यातील जांभरुण, अंबड तालुक्यातील बोरी व  दहिपुरी येथे जाईल. या यात्रेसमवेत पंचायत समिती अंतर्गत अधिकारी-कर्मचारी असतील.

विकसित भारत संकल्प यात्रेस ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. ही यात्रा 26 जानेवारी 2024 पर्यंत सुरू राहणार असून या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळत आहे. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यत, स्वयंरोजगारापासून कृषीपर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनांचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

                                                                        -*-*-*-*-

No comments:

Post a Comment