Thursday 7 December 2023

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2020-21 व 2021-22 अंतर्गत ग्रामपंचायतींना विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते होणार पुरस्काराचे वितरण 8 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सकाळी 11.30 वा. कार्यक्रम

 


जालना, दि. 7 (जिमाका) – संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2020-21  व 2021-22 अंतर्गत निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतींना विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते दि. 8 डिसेंबर 2023 रोजी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

जालना शहरातील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात दि. 8 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 आयोजित या पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, ग्रामपंचायतींचे सरपंच उपस्थित राहणार आहेत.

ग्रामीण भागात स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अधिक परिणामकारक राबवून ग्रामीण भागातील कुटुंबांपर्यंत पोहचविणे आवश्यक असल्याने, राज्य शासनाने सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा स्तरावर व जिल्हा परिषद सर्कल निहाय तपासणी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या  ग्रामपंचायतींना  पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमास गट विकास अधिकारी, तालुका गट शिक्षणाधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) बालचंद जमधडे यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment