Friday 8 December 2023

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दि. 11 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन

 


जालना दि. 8 (जिमाका) :-   दि.3 डिसेंबर 2023 रोजीच्या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद यांच्या वतीने दि. 11 डिसेंबर 2023 रोजी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विशेष शाळेतील 400 दिव्यांग विद्यार्थी व कर्मचारी सहभागी होणार आहे. जिल्हास्तरीय क्रिडास्पर्धा जिल्हा क्रिडा संकुल जालना या मैदानावर सकाळी 8.30  ते दुपारी 4.00 या वेळेत आयोजीत करण्यात आलेल्या आहेत.

कार्यक्रम सकाळी जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्याचे सकाळी 8.00 वाजता जिल्हा क्रिडा संकुल येथे संचालन होणार असून तद्नंतर 11 वाजता जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय क्रिडा स्तरीय क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिष्द व इतर मान्यवर यांच्या हस्ते होणार असुन दुपारी 4.00 वा क्रिडा कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. असे जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment