Friday 1 December 2023

खेळातून सांघिक भावनेचा विकास होतो- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ जालन्यात राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

 








 

जालना, दि. 1 (जिमाका) – बेसबॉल स्पर्धेसाठी वेगवेगळ्या विभागातून जालना येथे खेळाडू आले असले तरी या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण राज्याचा एकच संघ राष्ट्रीय पातळीवर सहभागी होणार आहे, त्यामुळे सर्वांनीच जिद्द, चिकाटी आणि सांघिक भावनेने आपल्या खेळाचे प्रदर्शन करुन आपले शहर, विभागाचा नावलौकिक वाढवावा.  खेळातूनच सांघिक भावनेचा विकास होत असतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, जालना यांच्यावतीने जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर  आयोजित 17 वर्षा खालील  मुले व मुलींच्या राज्यस्तर  शालेय बेसबॉल स्पर्धेचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रारंभी  प्रस्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी स्पर्धेचे महत्व विषद करून आयोजन समितीच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ . श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनात व संकल्पनेतून प्रथमच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या  सर्व खेळाडूंना  जिल्हा नियोजन समिती व जिल्हा क्रीडा परिषदेच्या माध्यमातून टी शर्ट , कॅप , देण्यात आली आहे. तर स्पर्धेत प्रथम,  व्दितीय ,  तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या संघातील खेळाडूंना स्मॉर्ट वॉच , मेडल , ट्रॉफी व राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झालेल्या खेळाडूंनापण स्मार्ट वॉच देण्यात येणार आहे, अशी  माहिती दिली.

महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सचिव राजेंद्र ईखनकर यांनी मार्गदर्शन करताना बेसबॉल खेळाची माहिती देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या .  यावेळी जालना जिल्हा बेसबॉल असोसिएशनचे अध्यक्ष  प्राचार्य निवृत्ती दिवटे , सचिव प्रमोद खरात,  डॉ. भुजंगराव डावकर, जिल्हा क्रीडा संघटक शेख चांद पीजे, निवड समितीचे सदस्य नंदन परब, श्रीमती रेखा धनगर, क्षितीजा गव्हाणे ,  स्पर्धा तांत्रीक समीती प्रमुख राजेंद्र बनसोडे,  अजय देशमुख, रवींद्र गुडे, प्रमोद रत्नपारखे ,  आनंदा कांबळे , विजय गाडेकर यांची उपस्थिती होती.

स्पर्धेत  मुंबई, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, लातूर, नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या आठ विभागातील खेळाडू व संघ व्यवस्थापक, पंच हे सहभागी झाले आहेत.

 स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या हस्ते क्रीडा मशाल प्रज्वलित करून व रंगीत फुगे हवेत सोडून  करण्यात आले. यावेळी जिल्ह्याची बेसबॉल राष्ट्रीय खेळाडू  अमृता शिंदे हिने खेळाडूंना शपथ दिली.    स्पर्धा यशस्वी करण्यासाठी  उपसंचालक , क्रीडा व युवक सेवा , छत्रपती संभाजी नगर  संजय सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा प्रमुख रेखा परदेशी,  खो खो मार्गदर्शक  संतोष वाबळे , क्रीडा मार्गदर्शक शेख मोहम्मद,   प्रमोद खरात, सतीश गाभुड, अमोल सातपुते, यासिन बागवान , संतोष प्रसाद , हारुण खॉन , राहुल गायके, जयपाल राठोड , याशिन बागवान अशोक शिंदे , ज्ञानेश्वर कळसे , आमोल सातपुते तसेच सदर स्पर्धेकरिता स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्यांचे पदाधिकारी व जिल्हा क्रीडा संघटक परिश्रम घेत आहेत. स्पर्धेकरीता प्रमुख पंच म्हणून आनंदा कांबळे , आकाश साबणे , गणेश बेटुडे , निशांत राजपूत , गणेश भोसले , सचिन जाधव , नंदू गायके , कागवत पाटील , शाहु देशमुख , नरून नवले , गणेश दुनघव  आदी काम पहात आहेत. तसेच स्पर्धा आयोजनास सतिष गाबुड ' आदी काम करत आहेत.

***

 

 

No comments:

Post a Comment