Tuesday 5 December 2023

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातील कार्यालय अधिक्षक नामदेव गोरे यांना सेवानिवृत्ती निमित्त दिला निरोप

 


जालना दि. 5 (जिमाका) :-  जालना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातील  कार्यालय अधिक्षक नामदेव गोरे हे प्रदीर्घ 37 वर्षाच्या शासकीय सेवेतून नियत वयोमानानूसार दि.30 नोव्हेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले. यावेळी निरोप समारंभात श्री. गोरे यांचा सन्मान करत सत्कार करण्यात आला.   

सचिव श्रीमती भारसाकडे म्हणाल्या की, प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात सेवानिवृत्ती हा महत्वाचा क्षण असतो. म्हणुन तो क्षण आपण आनंदाचा व अविस्मरणीय असा साजरा केला पाहिजे आणि तो क्षण आपण चांगल्या पध्दतीने द्यावा. एखाद्या मोठ्या अधिका-याचा सत्कार आणि सन्मान होणे साहजिक आहे पण अत्यंत प्रमाणिकपणे काम करणा-या कर्मचा-यास आपण मनापासुन निरोप दिला पाहिजे. असा सन्मान अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो, असे सांगितले. तसेच त्यांनी  कार्यालयातून श्री.गोरे यांना घरापर्यंत सोडण्यासाठी स्वतः गाडी चालविली. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment