Friday 1 December 2023

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत जमीन विक्रीचे प्रस्ताव सादर करावेत

 


 जालना दि. 30 (जिमाका) :- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन शेतमजूर कुटुंबांना 4 एकर जिरायत व 2 एकर बागायत शेतजमीन 100 टक्के अनुदानावर उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना लागू केली आहे. सदर योजनेंतर्गत जे शेतकरी लागवडीसाठी योग्य असलेली शेतजमीन शासकीय दराने (रेडीरेकनर) विकण्यास तयार आहेत, अशा शेतकऱ्यांची जमीन खरेदी करण्यात येते. खरेदी केलेली शेतजमीन ज्या गावात खरेदी करण्यात आली असेल, त्याच गावातील पात्र लाभार्थ्यांना या जमिनीचे वाटप करण्यात येते. या योजनेंतर्गत जे शेतकरी आपली शेतजमीन विकण्यास तयार आहेत, अशा शेतकऱ्यांनी जमीन विक्रीचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह म्हणजेच 7/12 उताऱ्यासह सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना यांच्याकडे किंवा संबंधित तहसिलदार, उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणाचे सहायक आयुक्त प्रदिप भोगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment