Thursday 7 December 2023

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत लघु उद्योगांकरीता जिल्हा पुरस्कार

 


जालना दि. 6 (जिमाका) :-  द्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लघु उद्योग घटकांना प्रथम व द्वितीय पारीतोषिक देवून गौरविण्यात येते. प्रथम पुरस्कारासाठी 15 हजार रुपये रोख व गौरवचिन्ह तसेच द्वितीय पुरस्कारासाठी 10 हजार रुपये रोख व गौरवचिन्ह देवून गौरविण्यात येते. सन 2023  या वर्षाकरीता जिल्हा पुरस्कारासाठी जिल्हयातील पात्र लघु उद्योग घटकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी खालील बाबींची पुर्तता करणे आवश्यक आहे.

उद्योग घटकाची एमएसएमई पोर्टलवर उद्यम आधार नोंदणी लघु उद्योग म्हणुन मागील तीन वर्षापुर्वी नोंदणी झालेली असावी व उद्योग घटक मागील दोन वर्षापासून उत्पादनात असणे आवश्यक आहे. उद्योग घटक कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.या पुर्वी ज्या उद्योग घटकांना राज्यस्तरीय किवा राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळालेले नाहीत असेच उद्योग घटक जिल्हा पुरस्कारासाठी पात्र ठरतील.तरी वरील बाबींची पुर्तता करणाऱ्या जिल्हयातील पात्र लघु उद्योग घटकांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत असे, आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, श्रीमती क.वि.खरात,यांनी केले आहे. विहीत नमुन्यातील अर्ज व अधिक माहिती करीता जिल्हा उद्योग केंद्र, जालना कार्यालयाकडे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख दि.29 डिसेंबर 2023  राहील याची नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र, महाव्यवस्थापक, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment