Friday 1 December 2023

7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन

 


 

 जालना दि. 30 (जिमाका) :-   भारतमातेच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले, अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडी- अडचणी दूर करुन त्यांचे दैनंदिन जिवन सुसह्य व्हावे यासाठी व त्याचप्रमाणे युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातुन सेवानिवृत्त झालेल्या जवानांच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी संपुर्ण भारतात 7 डिसेंबर हा दिवस " ध्वजदिन " म्हणुन साजरा करण्यात येतो. 7 डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबर अखेर पर्यंत ध्वजदिन निधी संकलन केले जात असते. तरी जिल्ह्यातील सर्व वीर पत्नी,वीर पीता,वीर माता,माजी सैनिक विधवा पत्नी, माजी सैनिक व त्यांचे अवलंबित, पत्रकार बांधव, उत्कृष्ट संकलन केलेल्या कार्यालयाचे अधिकारी- कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांनी कार्यक्रमास गुरुवार दि.7 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता " सैनिक संकुल", महासैनिक लॉन, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, क्रिडा संकूल समोर, जालना येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

दर वर्षी प्रमाणे या वर्षीही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना यांचे वतीने सशस्त्र सेना ध्वजदिन 2023 निधी संकलन शुभारंभ गुरुवार दि.7 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता " सैनिक संकुल", महासैनिक लॉन, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, क्रिडा संकूल समोर, जालना येथे जिल्हाधिकारी तथा ध्वजदिन निधी संकलन समिती अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या शुभहस्ते तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन- 2023 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमानिमित्ताने शहीद जवानांना श्रध्दांजली, देशाच्या सिमांचे रक्षण करतांना प्राणाचे बलिदान देवून शहिद झालेल्या सैनिकांच्या विरपत्नी, विरमाता व विरपिता यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांमध्ये सैनिकांविषयी जनजागृती व आपुलकी निर्माण करुन उत्कृष्ट कामगिरी करुन ध्वजदिन -2022 निधी संकलन केलेल्या कार्यालयांना पारितोषिक कार्यालय प्रमुख व संबंधीत कर्मचा-यांस प्रशस्तीपत्र वाटप तसेच माजी सैनिक/ विधवा पत्नी यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती/आर्थिक मदतीचे धनादेश, गौरव पुरस्कार व प्रशस्ती पत्र वाटप करण्यात येणार आहेत. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-

No comments:

Post a Comment