Monday 4 December 2023

पिक विमा योजनेत संत्रा व रब्बी ज्वारी या पिकांसाठी पिक विमा योजनेत भाग घेण्यास मुदतवाढ

 


 

 जालना दि. 4 (जिमाका) :-   महाराष्ट्र राज्यातील पिकविमा योजना अंतर्गत 2023-24 मध्ये संत्रा व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दि. 30 नोव्हेंबर 2023 होता मात्र पिक विमा पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचणी उध्दभवल्यामुळे काही इच्छुक शेतकरी या पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले. या शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घेता यावा या दृष्टीकोनातून जिल्‌ह्यातील संत्रा या फळपिकासाठी व रब्बी हंगामातील ज्वारी या पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याकरीता दि.5 डिसेंबर पर्यंतची मुदतवाढ केली आहे.

विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिलेले इच्छुक शेतकरी वरील फळपिक व रब्बी ज्वारी या पिकांसाठी 5 डिसेंबर 2023 रोजी पर्यंत विमा योजनेत सहभाग घेऊ शकतात. याचा जिल्ह्यातील संत्रा व रब्बी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभगामार्फत करण्यात येत आहे. तरी रब्बी हंगामातील गहू, हरभरा व रब्बी कांदा पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दि. 15 डिसेंबर 2023 असा आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment