Friday 8 December 2023

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण विषयक जाहीर सुनावणीची सुचना

 


 

जालना दि. 8 (जिमाका) :- पर्यावरण व वने मंत्रालय, भारत सरकार यांची अधिसूचना दि. 14 सप्टेंबर 2006 अन्वये मे. समृध्दी शुगर्स लिमिटेड, गट नं. 111,119,120,122,123,124,125,146, व 173 गाव देवीदहेगाव, ता. घनसावंगी, जि. जालना या प्रस्तावित विस्तार प्रकल्पामध्ये साखर कारखाना 2 हजार 500 टन प्रतिदिन वरुन 7 हजार 500 टन प्रतिदिन पर्यंत विस्तार आणि नवीन 110 किलो लिटर प्रतिदिन ऊस सिरप/मोलॅसीस आधारीत आसवणी प्रकल्प उत्पादन करणेबाबत पर्यावरणविषयक जाहीर लोकसुनावणीकरीता अर्ज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्राप्त झालेला आहे. सदर प्रस्तावित विस्तारीकरण प्रकल्पाकरीता पर्यावरणविषयक जाहीर लोकसुनावणी आयोजित करण्यात येत आहे. जाहीर लोकसुनावणीचे ठिकाण, दिनांक व वेळ खालीलप्रमाणे नमूद केलेली आहे.

सुनावणीचे ठिकाण –मे. समृध्दी शुगर्स लिमिटेड, गट नं. 111,119,120,122,123,124, 125, 146 व 173 गाव देवीदहेगाव, ता. घनसावंगी, जि. जालना दि. 4 जानेवारी 2024 वेळ- दुपारी 12.00 वाजता.

सदर प्रकल्पाबाबत लेखी स्वरुपात विचार, टिका टिपण्णी सादर करावयाची असल्यास जाहीरात प्रसिध्द झाल्यापासून जाहीर सुनावणीच्या तारेखेपूर्वी खालील पत्त्यावर पाठविण्यात याव्यात.

उपप्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्लॉट नं. पी-3/1 व पी-3/2, अतिरिक्त एमआयडीसी फेज -2 जालना, ईमेल-  srojalna@mpcb.gov.in  वेब- www.mpcb.gov.in फोन- 02482-220120

त्याचप्रमाणे सदर प्रकल्पाच्या परिसरामधील रहिवासी, पर्यावरणविषयी काम करणाऱ्या संस्था, सदर प्रकल्पामुळे अन्यप्रकारे प्रभावीत होणारे रहिवासी यांना सदर प्रकल्पासंबंधी विचार, टिका, टिप्पणी तोंडी किंवा लेखी स्वरुपात जाहीर सुनावणी दरम्यानसुध्दा नोंदविता येतील. सदर प्रकल्पाविषयी व पर्यावरण अहवालाच्या सारांशाची माहिती असलेले दस्तावेज (इंग्रजी व मराठी) मध्ये खालील कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. संबंधित व्यक्ती खालील कार्यालयामध्ये सदर कागदपत्रे कार्यालयीन वेळेत अभ्यासू शकतील.

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा उद्योग केंद्र, तहसिलदार, तहसिल कार्यालय, घनसावंगी, ग्रामपंचायत कार्यालय, कोठाळा ब्रु. घाणेगाव, सिंदखेड, देविदहेगाव, पाडूळी  खु., मच्छिंद्रनाथ चिंचोली, भेंडाळा, ता. घनसावंगी , उपप्रादेशिक कार्यालय, म.प्र. नि. मंडळ, प्लॉट नं. पी-3/1 व पी-3/2, अतिरिक्त एमआयडीसी फेज-2 जालना, प्रादेशिक कार्यालय, म. प्र. नि. मंडळ, भूखंड क्र. ए-4/1, एमआयडीसी चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुख्यालय, कल्पतरु पॉईन्ट , 3 रा माळा, सायन माटुंगा स्कीम रोड नं. -8 सायन सर्कलसमोर, सायन (पूर्व), मुंबई-22, पर्यावरण विभाग, नवीन प्रशासन भवन,15 वा मजला, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई -32, प्रादेशिक कार्यालय, पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, पश्चिम मध्य विभाग, तळमजला, पूर्व विंग, नवीन सचिवालय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर अशी माहिती, उप-प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सो.म. कुरमुडे यांनी दिली आहे,असे तहसिलदार (सर्वसाधारण) अनिल नव्हाते यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment