Friday 15 December 2023

मुद्रांक शुल्काचा कमी भरणा करणा-यांना मिळणार “अभय” योजनेचा लाभ दंडामध्ये मिळणार सवलत

 


जालना, दि. 15 (जिमाका):-  दस्तांची नोंदणी करताना मुद्रांक शुल्काचा कमी भरणा केल्याचे आढळुन आल्यास दंड भरुन ते नियमीत करता येतात. अशासाठी शासनाने अभय योजना आणली असुन यामध्ये मुद्रांक शुल्क्‍ आणि दंडामध्ये ही भरघोस सवलत दिली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी आर.बी.मुळे यांनी केले आहे.

      अभय योजनेबाबत शासनाने 7 डिसेंबर 2023 रोजी अधिसुचना जारी केली आहे. 1 जानेवारी 1980 ते दि.31 डिसेंबर 2000 या कालावधीतील नोंदणीकृत / अनोंदणीकृत निष्पादित दस्तऐवजासाठी देय असणाऱ्या मुद्रांक शुल्क व त्यावरील दंडामध्ये सुट तथा सवलत लागू केली आहे. हा दंड मुद्रांक शुल्कापैकी कमी शुल्क्‍ भरुन झालेल्या दस्तऐवजांना  व वसुलीस पात्र मुद्रांकासाठी आहे.1 डिसेंबर 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत दोन टप्प्यात मुद्रांक दंड सवलत अभय योजना 2023 सूरु केली आहे. भविष्यात होणा-या महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 46 वसुली कायदयानुसार सक्तिची कारवाई टाळण्यासाठी हि संधी नागरिकांना उपलब्ध्‍ करुन देण्यात आली आहे.

 

      या योजनेच्या पहिल्या टप्यात ही योजना 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत मुद्रांक शुल्क्‍ 1 रुपया ते 1 लाख पर्यंतच्या रकमेसाठी  कमी पडलेल्या मुद्रांक शुल्कासाठी 100% माफी व 1 लाखापेक्षा अधिक रकमेसाठी, कमी पडलेल्या मुद्रांक शुल्कासाठी 50% माफी असेल व मुद्रांक शुल्क्‍ दंडाची रक्कम 100 %माफी असेल. दुस-या टप्प्यात 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत 1रुपयापासुन ते 1 लाख रुपयापर्यंतच्या रक्कमेसाठी कमी पडलेल्या मुद्रांक शुल्कासाठी 80% माफी व दंडाच्या रकमेत 80% माफी दिली आहे. तर 1 रुपयापासुन ते 1 लाख रुपयापेक्षा जास्त्‍ रकमेसाठी कमी पडलेल्या मुद्रांक शुल्कासाठी 40% माफी देण्यात येणार असून दंडाच्या रकमेत 70% माफी देण्यात आली आहे.

      1जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत निष्पादीत केलेले परंतु नोंदणीसाठी दाखल न केलेल्या दस्तांबाबत वसुलीस पात्र मुद्रांक शुल्क्‍ व लागु होणा-या दंडात सवलत लागु करण्यात आलेली आहे.

         पहिल्या टप्यात ही योजना 01 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 पर्यंतच्या कालावधीत 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2020 या दरम्यान निष्पादीत केलेल्या संलेखावरील मुद्रांक शुल्क्‍ 1 रुपया ते 25 कोटी रुपयापर्यंतच्या रकमेंसाठी कमी पडलेल्या मुद्रांक शुल्कासाठी 25% सवलत देण्यात येणार आहे व दंडामध्ये 90% सवलत देण्यात येत आहे .तर दुस-या टप्प्यात 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 दरम्यान 1 रुपया ते 25 कोटी रुपयापर्यंतच्या रकमेंसाठी कमी पडलेल्या मुद्रांक शुल्कासाठी 20% सवलत व दंडावर 80%सवलत देण्यात येणार आहे.

   

       या अगोदर कमी पडलेला मुद्रांक शुल्क्‍  व दंड भरण्यासाठी ज्यांना नोटीस प्राप्त्‍ झाली आहे.तसेच   7/12

उताऱ्यावर, मिळकत पत्रिकेवर इतर अधिकारामध्ये, मुद्रांक शुल्काचा बोजा असल्यास या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या अर्जासह सह जिल्हा निबंधक वर्ग-1 जालना ,पत्ता:- प्रशासकिय इमारत ,दुसरा मजला जिल्हाधिकारी कार्यालय जालना, तसेच  नजिकचे दुय्यम निबंधक कार्यालयांशी संपर्क साधावा असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.                   

                                                                    -*-*-*-*-

No comments:

Post a Comment