Wednesday 13 December 2023

केंद्रीय पथकाद्वारे दुष्काळी स्थितीची पाहणी







जालना,दि. 13 (जिमाका):-  केंद्रीय आंतर मंत्रालयीन समितीच्या पथकाने आज जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी केली. या पथकात केंद्रीय कापूस विकास अधिकारी डॉ. ए.एल. वाघमारे व मुल्यमापन व संनियंत्रण अधिकारी हरिष हुंबर्जे यांचा समावेश होता. या पथकाने आज भोकरदन तालुक्यातील जुई धरण, पंढरपूरवाडी, हसनाबाद, फुलेनगर, पिंपरी या गावालगत असणाऱ्या शेतातील पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करुन पिक परिस्थिती व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

या पाहणी दरम्यान पथकासमवेत अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त श्री. कांबळे, तहसिलदार संतोष बनकर आदींसह कृषी व महसूल विभागाचे स्थानिक कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते. 

                                                                    -*-*-*-*-*-        

No comments:

Post a Comment