Monday 6 March 2023

रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम जालना येथे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

 


 जालना, दि. 6 (जिमाका) :- नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्यामार्फत   डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सांस्कृतिक सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे दि. 8 मार्च, 2023 बुधवार सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह जागेवर निवड संधी आयोजित करण्यात आलेली आहे. तरी उमेदवारांनी उपस्थित राहून प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या पर्वणीचा निश्चित लाभ घ्यावा, असे आवाहन जालना कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त संपत चाटे यांनी केले आहे.

भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्रा. लि. जालना यांची दहावी/बारावी/ पदवीधर उत्तीर्ण करीता मशिन ऑपरेटर 15 पदे, एम.बी.ए. साठी एच. आर एक्झिक्युटिव्ह 2 पदे, डिप्लोमा इंजिनिअर सिव्हिल / पदवीधर (B.E/B.tech) सिव्हिल इंजिनिअर साठी 3 पदे, डिप्लोमा इंजिनिअर मेकॅनिकल पदवीधर (B.E/B.tech) मॅकनिकल इंजिनिअर साठी 15 पदे आणि ज्ञानेश्वरी सेक्युरिटी सर्व्हिस जालना यांची दहावी/ बारावी साठी सुरक्षा रक्षक (पुरुष/स्त्री)/15 पदे, बाऊंसरसाठी 5 पदे, माजी सैनिक साठी 5 पदे, सुपरवायझर साठी 4 पदे, अशी एकूण 64 रिक्तपदे प्राप्त झालेली आहेत. याकरीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणा-या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध आहे.

जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक (Job Seekar) लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्ड च्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅसबोर्ड मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून जालना जिल्हा निवडून त्यातील स्पेशल जॉब फेयर-3 जालना याची निवड करावी. उद्योजक/नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान दोन प्रतीत बायोडाटासह फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आदीची कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायांकित प्रतीचा संच सोबत ठेवून बुधवार दि. 8 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सांस्कृतिक सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, समोर, जालना येथे उपस्थित रहावे, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment