Thursday 2 March 2023

लोकशाही दिनाचे 6 मार्च रोजी आयोजन

 


      जालना दि. 2 (जिमाका) :- जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 6 मार्च 2023 रोजी सकाळी ठिक 10.00 ते 12.00 वाजेपर्यंत लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे.   या लोकशाही दिनामध्ये अर्ज देताना त्यांनी संबंधित तालुक्यांतील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व सदर तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच अर्जदाराने टोकन क्रमांकाच्या पावतीसह विहीत नमुन्यत दोन प्रतीमध्ये अर्ज सादर करावा तसेच ज्या अर्जदाराने तालुकास्तरीय लोकशाही दिनात भाग घेतला नाही अशा अर्जदाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, लोकशाही दिनाकरीता अर्जदार यांनी अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठवणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या कार्यालयाकडुन सुचीत केले आहे. कोणत्याही  स्तरावर लोकशाही दिनात  खालील बाबींशी संबंधित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.  न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपील, सेवाविषयक आस्थापनाविषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज. तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची तहसिलदार यांच्या स्वाक्षरीची पोचपावती तसेच त्यासाठी दिलेल्या मुदती व नमुन्यात ज्यांनी यापुर्वीच्या आवश्यक कागद पत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल. ज्यांनी त्यापुर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे. परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नये. तसेच लोकशाही दिन विहित नमुन्यात अर्ज  htt:jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) शर्मिला भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment