सकाळी
7 वा. जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयापासून दौडला प्रारंभ
जालना, दि. 3 (जिमाका) :- संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक
तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. पौष्टीक
तृणधान्य पिकातील पोषणमुल्य व त्यांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे सकारात्मक
परिणाम जनसामान्यांच्या लक्षात येण्यासाठी
जिल्हास्तरीय मिलेट (तृणधान्य) दौडचे दि.4 मार्च 2023 रोजी सकाळी 7 वाजता आयोजित
करण्यात आली आहे. मिलेट दौड जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयापासून (मोतीबाग
समोर, जालना) सुरु होवून शनि मंदीर मार्गे गांधी चमन असा मार्ग
असा आहे. पुन्हा गांधी चमन येथून दौड वरील मार्गाप्रमाणे जिल्हा अधीक्षक कृषी
अधिकारी कार्यालयाकडे येईल. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एस.रणदिवे
यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment