Monday 6 March 2023

सामुहिक विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या अनुसूचित जातीतील दाम्पत्यासाठी कन्यादान योजना

 


 

जालना, दि. 6 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सामुहिक विवाह सोहळयात भाग घेवून विवाह करणाऱ्या अनुसूचित जाती (नवबौध्दांसह) दाम्पत्यासाठी कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. सन 2022-23 या वर्षासाठी सामुहिक विवाह सोहळे आयोजित करणाऱ्या स्वंयसेवी संस्थांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जालना येथे प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी केले आहे.

 कन्यादान योजनेनुसार सामुहिक विवाह सोहळ्यात भाग घेवून विवाह करणाऱ्या वधूचे वडील, आई किंवा पालक यांच्या नावे रु. 20000 /- अनुदान क्रॉस चेकने देण्यात येते. तसेच सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रति पात्र जोडपे रु.4000 /- प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येते. तसेच वराचे वय 21 वर्ष व वधूचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. योजनेअंतर्गत अर्थसहाय्यासाठी अर्जाचा नमुना जालना समाज कल्याण कार्यालयातून उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तरी कन्यादान योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा, असे असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                                               -*-*-*-*-

No comments:

Post a Comment