Tuesday 21 March 2023

जिल्हा निवडणूक कार्यालयास प्राप्त व्हीव्हीपॅट मशिन्सची टेस्ट प्रोसेस 23 मार्चपासून

 


 

जालना, दि. 21 (जिमाका)-- भारत इलेक्ट्रोनिक्स,पंचकुला, हरियाणा  येथून 2 हजार 440 व्हीव्हीपॅट मशिन्स जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयास दि. 18 मार्च 2023 रोजी प्राप्त झाल्या आहेत. या  व्हीव्हीपॅट मशिन्स जालना येथील  महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम, जुना मोंढा, बस स्थानकाजवळ या ठिकाणी 20 मार्च रोजी स्कॅनिंग करून सुरक्षा कक्षात ठेवण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशनानुसार सदरील व्हीव्हीपॅट मशिन्सची ॲक्सपटन्स टेस्ट प्रोसेस (acceptance test process) करावयाच्या सूचना आहेत. ही प्रक्रीया दि. 23 मार्च 2023 पासून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम, जुना मोंढा, बस स्थानकाजवळ, जालना या ठिकाणी पार पाडली जाणार आहे, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे यांनी दिली आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment