Monday 6 March 2023

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम व महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

 


 

जालना, दि. 6 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाजकल्याण आयुक्तालय,  पुणे आणि  प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्यावतीने    दि. 8 मार्च 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे  जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आणि महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

समाज कल्याणच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी विशेष परिश्रम घेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्याचे योजिले आहे.  या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील अधिकारी महिला व महिला कर्मचारी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. डॉ. प्रतिभा आहिरे, डॉ. स्नेहल गडप्पा या मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमास  जयश्री सोनकवडे, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण कार्यालय,  संगीता मकरंद, उपायुक्त,जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड,  श्रीमती वैशाली हिंगे, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना,  गिता गुट्टे, सहाय्यक आयुक्त, परभणी, श्रीमती एस के भोजने, जिल्हा समाज कल्याण अधिकारी,  जयश्री चव्हाण, कार्यालय अधीक्षक, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर,  निर्मला बारसे, कार्यालय अधीक्षक, सहाय्यक आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांची उपस्थिती राहणार आहेत. असेही कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

 

 

 

No comments:

Post a Comment