Friday 3 March 2023

किमान कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील उमेदवारांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी

 

उमेदवारांना प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन


 

जालना, दि. 3 (जिमाका) :- जिल्ह्यातील युवक-युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करून त्यांना अधिक मागणी असलेल्या क्षेत्रात रोजगार/स्वंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2022-23 या योजनेंतर्गत पात्रताधारक व इच्छुक असलेल्या युवक-युवतींना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरी या योजनेतंर्गत जिल्ह्यातील रोजगारासाठी इच्छुक असणाऱ्या युवक-युवतींनी मोफत देण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी www.bit.ly/3UEq7fu या गुगल फॉर्म लिंकवर ऑनलाईन नोंदणी करावी. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त संपत चाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीमार्फत निवड केलेल्या अभ्यासक्रमामध्ये जालना जिल्ह्यात कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्याकरीता शासनाकडून सुचीबध्द प्रशिक्षण संस्थांची प्रशिक्षण केंद्र म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्यानुसार कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर या केंद्रास सेरीकल्चरिस्ट (272 तास, शिक्षण 5 वी पास), आणि क्वालिटी सिड ग्रोवर (380 तास, शिक्षण 10 वी पास), शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मंठा या केंद्रास टू व्हिलर सर्विस टेक्नीशियन (480 तास, शिक्षण 10 वी पास), शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,अंबड या केंद्रास टू व्हिलर सर्विस टेक्नीशियन (480 तास, शिक्षण 10 वी पास), शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,परतूर या केंद्रास ब्युटी थेरपिस्ट (450 तास, शिक्षण 10 वी पास),श्री शिवशक्ती एज्युकेशन सोसायटी, भोकरदन या केंद्रास ब्युटी थेरपिस्ट (450 तास, शिक्षण 10 वी पास), शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,जालना या केंद्रास फील्ड टेक्नीशियन एअर कंडीशनर (400 तास, शिक्षण 12 वी पास) आणि आयर्न ॲण्ड स्टिल मशिनिस्ट (600 तास, शिक्षण 10 वी पास), शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बदनापूर या केंद्रास इलेक्ट्रीशियन डोमेस्टीक सोल्युशन  (360 तास, शिक्षण 10 वी पास), शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घनसावंगी या केंद्रास इलेक्ट्रीशियन डोमेस्टीक सोल्युशन  (360 तास, शिक्षण 10 वी पास), प्रधानमंत्री कौशल्य केंद्र, जालना या केंद्रास काऊंन्टर सेल एक्झीकेटीव्ह (564 तास, शिक्षण 12 वी पास), शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,जाफ्राबाद या केंद्रास सेल्फ एम्प्‍लॉयड टेलर  (360 तास, शिक्षण 8 वी पास), शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,भोकरदन या केंद्रास सेल्फ एम्प्‍लॉयड टेलर  (360 तास, शिक्षण 8 वी पास) प्रशिक्षण सुरू करणेसाठी प्रशिक्षण लक्ष्य वितरीत करण्यात आलेले आहे.

किमान कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणास इच्छूक उमेदवारांनी  वरील अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणास नाव नोंदणी करणेसाठी सदर प्रशिक्षण संस्थेस प्रत्यक्ष भेट देवून किंवा  www.bit.ly/3UEq7fu गुगल फॉर्म लिंकवर ऑनलाईन नोंदणी करावी. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या www.facebook.com/jalnaSkilldevelopment या फेसबुक पेजवरही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कार्यालयाच्या jalnarojgar@gmail.com या ई-मेलवर आपली नोंदणीसाठी माहिती सादर करावी. त्याचप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, जालना या कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा 02482-299033 या दुरध्वनीवर संपर्क साधावा. असे सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment