Thursday 2 March 2023

3 ते 9 मार्च दरम्यान कर्णबधिरता सप्ताह शासकीय रुग्णालयात विशेष तपासणी मोहिम

 


 

     जालना दि. 2 (जिमाका) :-3 मार्च जागतिक श्रवण दिनानिमित्त दि. 3 मार्च ते 9 मार्च 2023 पर्यंत कर्णबधिरता सप्ताह जालना जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय आरोग्य संस्थेत साजरा करण्यात येणार आहे.  त्यासाठी घोषवाक्य :-  Ear and Hearing care for all,Let’s  make it reality  हे राहील. त्या अनुषंगाने ज्यांना कानाचा कुठलाही आजार असल्यास, जसे आवाजाकडे लक्ष न देणारी बालके, मोठ्या आवाजाला न दचकणारी बालके, तसेच कानात जंतुसंसर्ग असल्यामुळे कान फुटलेले रुग्ण, कानातुन घाणेरडा वासाचा पस निघात असलेले रुग्ण, कान दुखत असलेले रुगण, म्हातारपणामुळे कमी ऐकू येत असल्यालेले रुगण, यांनी नजीकच्या शासकीय दवाखान्यात जाऊन आपली तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. आवश्यक रुग्णांची ओएई, ऑडीयोमेट्री व BERA  ची तपासणी सामान्य रुणालय,  जालना येथे नाक, कान, घसा विभागात करण्यात येईल व गरजुंना उपचार व श्रवणयंत्र देता येईल.  0 ते 5 वयोगटातील बालकांमध्ये श्रवण दोष आढळल्यास त्यांची BERA तपासणी करुन, श्रवण यंत्र व कॉकलियर इम्प्लांट विशेष योजनेतुन (DEIC) केले जाऊ शकते. तरी सर्व जनतेला विनंती आहे की, त्यांना या कर्णबधिरता सप्ताहाचा लाभ घ्यावा व नजिकच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधाण्याचे आवाहन जिल्हा शलय चिकित्सक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment