Monday 6 March 2023

जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी अधिकारी-कर्मचारी घेणार बालविवाह निर्मुलनाची शपथ

 


 

जालना, दि. 6 (जिमाका) :- जागतिक महिला दिनानिमित्ताने बुधवार, दि. 8 मार्च 2023 रोजी सकाळी 10.55 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सर्व अधिकारी व कर्मचारी बालविवाह निर्मुलनाची शपथ घेणार आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सदर दिवशी ध्वजारोहणाच्या प्रांगणात वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

*-*-*-

No comments:

Post a Comment