Thursday 23 March 2023

24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त लेख होय ! आपण क्षयरोग संपवू शकतो...!

 


 

भारत सरकारने सन 2005 पर्यंत क्षयमुक्त भारत देश करण्यासाठी सर्वच क्षेत्रामध्ये महत्वाची पावले उचलली आहेत. याकरिता आपणास प्रत्येक क्षयरुग्णापर्यंत पोहोचलो तरच आपण 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत देश करुन करतो. जालना जिल्ह्यातील 2022 या वर्षातील क्षयरोगाबाबतची स्थितीमध्ये थुंकी दुषित क्षयरुग्ण 1059, थुंकी अदुषित क्षयरुग्ण 1022, फुफ्फुसाव्यतिरीक्त 570 असे एकुण 2651 अशी आकडेवारी आहे. या वर्षीचे आपले उदिष्ट 100 टक्के पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहे. या प्रमुख उद्देशानेच क्षयरोगाबाबतची माहिती खालील प्रमाणे देण्यात येत आहे.

 

क्षयरोगाचे भारतातील प्रमाण :- प्रत्येक दोन मिनिटाला एक रुग्ण क्षयरोगाने मरण पावतो. एक थुंकी दुषित रुग्ण वर्षभरात १० ते १५ लोकांना क्षयरोगाचा प्रसार करतो. यामुळे क्षयरुग्ण संख्येत वाढ होत आहे. यामुळे या रोगाचे गार्भीयाणे घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण उद्याचा भारत देश क्षयरोग मुक्त असला पाहिजे,

 

क्षयरोग म्हणजे काय ? :- क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावांच्या जंतु मुळे होतो. या जंतुचा शोध डॉ रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने २४ मार्च १८८२ रोजी लावला. हे जंतु मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतात. त्यामुळे फुफ्फुसाचा क्षयरोग होतो. परंतु काही रुग्णांमध्ये शरीराच्या इतर भागावरही उदा, हाडे, मज्जातंतु, सांधे, लिम्फ नोड इ.) या जंतुचा परिणाम होतो.

 

क्षयरोग कसा पसरतो ? :- मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हे क्षयरोगाचे जंतु हवेतून पसरतात (ड्रॉपलेट इनफेक्शन)- फुफ्फुसाचा क्षयरोग असलेला रुग्ण जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तेंव्हा क्षयरोगाचे हे जंतु हवेत पसरतात व ज्यावेळी निरोगी मनुष्य श्वास घेतो तेंव्हा हे जंतु त्याच्या शरीरात प्रवेश करतात व ज्यावेळी त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होते त्यावेळी क्षयरोगाचे लक्षणे दिसुन येतात.

 

क्षयरोगाचे लक्षणे :- अ) सर्वसाधारण व्यक्ती :-२ आठवडयापेक्षा जास्तीचा खोकला, संध्याकाळी ताप येणे, वजनात घट, भूक मंदावणे छातीत दुखणे, खोकल्यातून किंवा थुंकीतून रक्त पडणे. ब) अति जोखमीच्या व्यक्ती :- थुंकी दुषित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती, मधुमेही, एच. आय. व्ही बाधीत रुग्ण, कुपोषित व्यक्ती, प्रतिकार शक्ती कमी असलेले, धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती, स्टेरॉईड घेणान्या व्यक्ती, मुत्रपिंडाचे आजार असणाऱ्या व्यक्ती, फुप्फुसाचे इतर आजार असणान्या व्यक्ती (दमा / COPD) यांना एक दिवसाचा जरी खोकला असला तरी ती क्षयरोगाची संशयीत व्यक्ती आहे म्हणून त्यांनी क्षयरोगाची तपासणी करावी. फुप्फुसाव्यतीरीक्त क्षयरोग :- मानेवर सुज व गाठी, मज्जातंतू, हाडे, सांधे, पाठीचे मणके इ. शरीराच्या अवयवांना क्षयरोग होतो, साला फुफुसाव्यतिरीक्त क्षयरोग म्हणतात.

क्षयरोगाचे निदान :- क्षयरोगाचे निदान है थुंकी ( बेडका) तपासणीव्दारे व छातीचा क्ष-किरण तपासणी करून केले जाते. यामध्ये संशयीत क्षयरुग्णांची दोन बेडका नमुने तपासणीसाठी घेतले जातात. सुक्ष्मदर्शनाखाली दोन्ही थुंकी नमुन्यावर प्रक्रिया करून तपासणी केली जाते. संबधीत रुग्णाची बेडका तपासणी व क्ष-किरण तपासणी केल्यानंतरसदरील रुग्ण पॉझिटीव्ह असल्यास वैद्यकीय डॉट्स अधिकाऱ्यामार्फत ९९ डॉट्स औषधोपचार सुरु करण्यात येतात. तसेच सिबीनॅट तपासणीही करतात. बरील सर्व तपासण्या शासकीय रुग्णालयात मोफत केल्या जातात.

 

औषधोपचार :- राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत ९९ डॉटस् औषधोपचार प्रणालीचा वापर केला जातो शासनाने ०१ जानेवारी-२०१७ पासुन ९९ डॉटस् औषधोपचार प्रणाली अंमलात आणली आहे. या औषधोपचार प्रणालीमध्ये क्षयरुग्णांना वजनाप्रमाणे औषधोपचार हे या पध्दतीचे मुख्य वैशिष्टये आहे. या उपचार पध्दतीमध्ये २५ ते ३४ किलो वजन असणाऱ्या क्षयरुग्णास ०२ गोळया ३५ ते ४९ किलो वजन असणान्या क्षयरुग्णास ०३ गोळया, ५० ते ६४ किलो वजन असणाऱ्या क्षयरुग्णांस ०४ गोळया ६५ ते ७५ किलो वजन असणान्या क्षयरुग्णास ०५ गोळ्या व ७५ किलोच्या पुढे वजन असणाऱ्या क्षयरुग्णास ०६ गोळ्या वजनाप्रमाणे दिल्या जातात व क्षयरुग्णावर ०६ महिने उपचार केला जातो व नियमितपणे फॉलोअप घेण्यात येतो. हा सर्व औषधोपचार क्षयरुग्णांना शासनामार्फत मोफत देण्यात येतो ९९ डॉटम् औषधोपचार पध्दतीमुळे जिल्हयातील जास्तीत जास्त क्षयरुग्ण बरे होत आहेत व ही क्षयरोगावरील प्रभावी औषधोपचार पध्दती ठरत आहे.

 

डी.आर.टिबी :- जालना जिल्हयात दिनांक १४ फेब्रुवारी २०११ पासून डि.आर टिवी औषधोपचार प्रणाली सुरु करण्यात आली आहे. क्षयरुग्णांनी डि.एस. टिबी औषधोपचार प्रणाली प्रमाणे व्यवस्थित औषधी न घेतल्यास कोणताही फॉलोअप लुटम पॉझीटीव्ह, डिफॉल्टर, फेल्युअर, रिलॅप्स केस, एचआयव्ही बाधीत अशा केसच्या संशयित क्षयरुग्णांना हि.नार टिबी जीत क्षयरुग्ण म्हणतात. डॉट प्लस साइट येथे रुग्णाच्या विविध शारीरीक व रक्ताची तपासणी केली जात. तसेच स्थाना डॉट प्लसचे औषधे व्यवस्थितरीत्या रुग्णाच्या शरीराम लागू होतात किंवा नाही याची खात्री केल्या जाते. डॉट पदम साईटने ठरवून दिलेल्या नुसारच औषधोपचार ११ ते २४ महिने दिल्या जातो. तसेच नविन औषधी बिद्याक्युलीन व डेलामैनी है भोपथी क्षयरोगावर अत्यंत प्रभावी ठरत असुन हे रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. सदर औषधीचा वर्ष १० ते १५ पर्यंत होतो व शासन सदर औषधी क्षयरुग्णास मोफत पुरवठा करते.

 

सिबीनॅट प्रयोगशाळा :- ०१ मे २०१६ पासुन जालना जिल्हयात मोफत सिबीनेंट तपासणीची सुविधा पुरविण्यात येत आहे. सद्यस्थितीमध्ये जालना जिल्हयात जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना जिल्हा क्षयरोग केंद्र जालना, उपजिल्हा रुग्णालय अंबड, ग्रामिण रुग्णालय घनसावंगी, ग्रामिण रुग्णालय परतुर या ठिकाणी क्षयरुग्णांना मोफत सिबीनंट तपासणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच ग्रामिण रुग्णालय भोकरदन याठिकाणी क्षयरुग्णांना सर्व सुविधा पुरविण्याकरीता सर्यवाही प्रस्तावित आहे. या प्रयोगशाळेत सर्व नविन क्षयरुग्ण कोणताही फॉलोअप स्फुटम पोझिटीव्ह, डिफॉल्टर फेल्युअर, रिलॅप्स फेस, लहान बालके, ईपी केसेस, एचआयव्ही बाधीत क्षयरुग्णांची मोफत केली जाते. क्षयरुग्णांचे निदान तो कोणता अयरोग आहे ? औषधास दाद देणारा किंवा औषधाला दाद न देणारा म्हणजेच डि.आर. टिवी आहे. हे पाहण्यासाठी रुग्णांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. या प्रयोगशाळेत सर्व शासन यंत्रणेत क्षयरोगाचा औषधोपचार घेणारे क्षयरुग्ण व खाजगी रुलात क्षयरोगाचा उपचार घेणारे क्षयरुग्ण यांची मोफत तपासणी केली जाते सदर तपासणी खाजगी प्रयोगशाळेत केली असता ते ४ हजार रुपये खर्च येतो, ही सेवा शासनामार्फत सर्व क्षयरुग्णांना उपरोक्त ठिकाणी मोफत देण्यात येत आहे.

 

निक्क्षय पोषण आहार योजना :- ०१ एप्रिल २०१८ पासुन भारत सरकारने क्षयरुग्णांसाठी निक्क्षय पोषण आहार योजनेची सुरवात केली आहे. या योजनेअंतर्गत शासकीय यंत्रणेकडे क्षयरोगाचा उपचार घेणारा क्षयरुग्ण किंवा बाजगी रुग्णालयात औषधोपचार घेणारा क्षयरुग्ण संपूर्ण क्षयरोग उपचार पुर्ण होईपर्यंत प्रती महिना ५०० रु. असे मानधन सकस पोषण आहार घेण्याकरीता क्षयरुग्णांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीव्दारे जमा करण्यात येते. वर्ष २०२२-२३ मध्ये जालना जिल्हयामध्ये शासकीय व खाजगी यंत्रणेकडे क्षयरोगाचा उपचार घेणान्या ३१०० क्षयरुग्णांना ७८, १९,५००/-रु. इतके अनुदान जिल्हा क्षयरोग केंद जालना मार्फत बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. सकस आहारामुळे प्रतिकारशक्ती बाहुन क्षयरोगी लवकर बरा होतो.

 

प्रधानमंत्री टिबीमुक्त भारत अभियान:- भारत सरकारने मा.राष्ट्रपती यांच्या अध्यक्षतेखाली दि. ९ सप्टेंबर २०२२ पासुन प्रधानमंत्री टिबीमुक्त भारत अभियान" ची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत उपचारावर असणाऱ्या क्षयरुग्णांना Additional Nutritional Support / Diagnostic Support / Vocational Support तसेच रुग्णांच्या गरजेनुसार मदत ही जिल्हयातील सिएसआर अंतर्गत येणाऱ्या औद्योगीक संस्था, सिड्स कंपन्या दानशुर व्यक्ती इत्यादीना "नस्य मित्र" बनवुन कम्युनिटी सपोर्ट टु टिबी पेशंटस् या योजनेअंतर्गत क्षयरुग्णांना मदत पुरविली जात आहे. माहे डिसेंबर २०१२ पासून उपचारावर असणान्या क्षयरुग्णांना ४९४५ कोरडया पोषण आहार किटचे वाटप विक्रम टि प्रोसेसर प्रा. ली. जालना व स्टिल मॅन्युफॅक्चरिंग (स्टिल उद्योग) जालना यांच्यामार्फत मा. डॉ. विजय राठोड जिल्हाधिकारी जालना यांच्या अध्यक्षतेखाली क्षयरुग्णांना कोरडया पोषण आहार किट वाटप करण्यात आलेले आहे. तसेच हयानामी जालना जिल्हा क्षयरोग मुक्त करण्याकरीता जिल्हयातील आद्योगीक संस्था, सामाजीक संस्था, दानमुर व्यक्ती इत्यादींनी क्षयरुग्णांना मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मा. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व डॉ. अश्वमेध जगताप, जिल्हा क्षयरोग अधिकारी जालना यांनी केले आहे.

 

प्रतिबंधात्मक उपाय योजना :- इंग्रजी मध्ये एक म्हण आहे "Prevention is better than cure." म्हणजेच कोणत्याही आजाराला बरे करण्यापेक्षा त्याला प्रतिबंध करणे केव्हाही चांगले. त्यासाठी खालील उपाययोजना आहेत. १. नवजात बालकांचे १०० टक्के बी.सी.जी. वे लसीकरण झाले पाहिजे. २. आपला आहार संतुलीत सरस प्रथीनेयुक्त असावा के. व्यसनांपासून दूर राहणे (धुम्रपान, दारू, तंबाखु) ४. की दुषित क्षयरुग्णांनी तोंडाला रुमाल किंवा एन-९५ मास्क बांधणे. संगीत क्षयरुग्णाला शोधून लवकर रोग निदान व औषधोपचार करणे. फुप्फुसाच्या क्षयरुग्णांच्या संपतील व्यक्तींना TPT-TB Preventive Treatment अंतर्गत वजनानुसार INH गोळया ०६ महिने घेणे आवश्यक आहे. ७. नातेवाईक, मित्र-मंडळी व घरातील इतर व्यक्तींनी सदर रुग्ण नियमित औषधोपचार घेतो की नाही ? याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण एक कीदुषित क्षयरुग्ण १० ते १५ लोकांना क्षयरोगाची बाधा करतो. ८. मधुमेह व इतर आजारांचे नियमित उपचार घेणे. २४ मार्च जागतिक क्षयरोग दिन २०२३ में घोषवाक्य खालीलप्रमाणे आहे. "होय ! आपण क्षयरोग संपवू शकतो" " YES! WE CAN END THE

धन्यवाद !!!

- डॉ. अश्वमेध जगताप,

जिल्हा क्षयरोग अधिकारी, जालना

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment